कॅबिनेटच्या बैठकीत चंद्रपूरातील दारुबंदी उठवत जनतेच्या मानातील निर्णय - आ. किशोर जोरगेवार
🔴दारुबंदी असूनही शहरातील गल्लीबोळात सर्रासरित्या दारु विक्री
चंद्रपुर (राज्य रिपोर्टर) : चंद्रपूरातील दारुबंदी हटविण्यात यावी अशी मागणी चंद्रपूरातील जनतेकडून केल्या जात होती. या दिशेने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. अखेर आज मुबंई येथे पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत चंद्रपूरातील दारुबंदी उठवत चंद्रपूरातील जनतेच्या मनातील निर्णय घेण्यात आला आहे.
चंद्रपूरात दारुबंदी नंतर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. दारुबंदी असूनही शहरातील गल्लीबोळात सर्रासरित्या दारु विक्री केल्या जात होती. तसेच दारुबंदी नंतर अमली पदार्थांची विक्रीही वाढली होती. मी स्वता करोडो रुपयांचा दारूसाठा पोलीस विभागाला पकडून दिला होता. दारूबंदी नंतर करोड रुपयांचा महसूल बुडाला होता. दारूबंदीचा मोठा परिणाम येथील व्यवसायांवरही झाल्याचे जाणवत होते. त्यामूळे चंद्रपूरातील दारुबंदी हटविण्याची मागणी जोर धरु लागली होती. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार येताच चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या होत्या. दारुबंदी नंतरचे दूष्पपरीणाम जाणून घेण्यासाठी समीक्षा समीतीही स्थापण करण्यात आली होती. या समीतीने आपला अहवाल राज्य शासणाला सादर केला होता. त्यानंतर सर्व बाजू तपासत तसेच जनतेची मागणी लक्षात घेता जिल्हातील दारु बंदी हटविण्यात आली. राज्य सरकारने चुकीचा निर्णय बदलवून योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे चंद्रपूरचा लोकप्रतिनीधी म्हणून मि या निर्णयाचे स्वागत करतो अशा शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी दारुबंदी हटविण्याचा निर्णय येताच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
0 Comments