चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद / पंचायतीची आरक्षण सोडत 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी

 



चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद / पंचायतीची आरक्षण सोडत 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी

◾बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपूरी, मूल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजुरा, नागभीड या नगर परिषदांमधील आणि भिसी

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपूरी, मूल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजुरा, नागभीड या नगर परिषदांमधील आणि भिसी नगर पंचायतीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांसह) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करायचे आहे. सदर आरक्षण सोडत 7 आणि 8 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात येणार असून त्यासाठी पिठासीन अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे.

असे आहे आरक्षण सोडतीचे वेळापत्रक : बल्लारपूर नगर परिषदेची आरक्षण सोडत 7 ऑक्टो. रोजी दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मूल, अजय चरडे), वरोरा न.प. आरक्षण सोडत 7 ऑक्टो. रोजी दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरोरा, संदीप भस्के), नागभीड 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ब्रम्हपूरी, पर्वणी पाटील), गडचांदूर 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजुरा, रविंद्र माने), चिमूर न.प. आरक्षण सोडत 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी चिमूर, किशोर घाटगे).

मूल न.प. आरक्षण सोडत 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मूल, अजय चरडे), भद्रावती 8 ऑक्टो. रोजी दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरोरा, संदीप भस्के), ब्रम्हपुरी 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, पर्वणी पाटील), राजुरा 8 ऑक्टो दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजुरा, रविंद्र माने), भिसी नगर पंचायतीची आरक्षण सोडत 8 ऑक्टो दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी चिमूर, किशोर घाटगे) आणि घुग्घुस न.प. आरक्षण सोडत 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी, लघिमा तिवारी)

आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी वरील नगर परिषद / पंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी केले आहे.

मतदार यादी अंतिम करण्याकरीता प्राधिकृत अधिका-यांची नेमणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मुल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजुरा, नागभीड या नगरपरिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2025 जाहीर केला आहे.               त्यानुसार जिल्हाधिका-यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने 8 ते 13 ऑक्टो. 2025 पर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करावयाची आहे.

बल्लारपूर न.प. ( प्राधिकृत अधिकारी तहसीलदार बल्लारपूर ), वरोरा न.प. ( प्रा. अधि. तहसीलदार वरोरा ), भद्रावती न.प. ( तहसीलदार भद्रावती ), ब्रम्हपुरी न.प. ( तहसीलदार ब्रम्हपुरी ), मूल न.प. ( तहसीलदार मूल ), घुग्घुस न.प. ( तहसीलदार चंद्रपूर ), चिमूर न.प. ( तहसीलदार चिमूर ), नागभीड न.प. ( तहसीलदार नागभीड ), राजुरा न.प. ( तहसीलदार राजूरा ), गडचांदूर न.प. ( तहसीलदार कोरपना ), भिसी न.पं. ( अपर तहसीलदार भिसी ).

उपरोक्तप्रमाणे प्राधिकृत केलेल्या अधिका-यांनी प्रारूप मतदार यादीवर 8 ते 13 ऑक्टो 2025 पर्यंत प्राप्त होणाऱ्या  हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून निर्णय घ्यावा व आवश्यक असल्यास योग्य त्या सुधारणा मतदार यादीत कराव्यात, असे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे.





Post a Comment

0 Comments