विज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू तर पती जखमी


विज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू तर पती जखमी

गोंडपिपरी,(राज्य रिपोर्टर) : शेतातून घरी जात असताना वाटेतच विज पडून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज घडली.
चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथील टिकाराम मडावी ,संगीता मडावी पती पत्नी शेतकामावरून घरी जात असताना वाटेत विज पडल्याने जागिच संगिता टिकाराम मडावी वय ३० हिचा जागीच मृत्यू झाला.
सायनकाडी ४ च्या सुमारास पाऊस लागल्याने घरी जायला निघालेल्या संगीतावर विज पडल्याने जागीच मृत्यू झाला या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Post a Comment

0 Comments