राष्ट्रवादी_वेल्फेअर_ट्रस्ट_मुंबई व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल तर्फे डॉक्टर्संना परिचारक व कर्माचारीवृंद यांना फेस शिल्ड (मास्क) चे वितरण
भद्रावती (राज्य रिपोर्टर): संपूर्ण भारतात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. भद्रावती तालुका व शहरचे डॉक्टर्स,आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस विभाग अन्य सेवा देणारे कर्मचारीच फक्त आपला जीव धोक्यात टाकून या संकट समयी नागरिकांची सेवा करीत आहे. महत्वाचे म्हणजे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे डॉक्टरांचे फार मोठे योगदान या घडीला होत आहे.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या ध्येयाला उराशी बाळगून सेवा देत असणाऱ्या भद्रावती ग्रामीण रुग्णालय डॉक्टर्सच्या चमूला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट मुंबई व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल जिल्हा चंद्रपुर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी भद्रावती तर्फे "फेस शिल्ड"(मास्क) भद्रावती ग्रामीण रुग्णालय येथे तहसीदार शितोडे साहेब,नगरध्यक्ष अनिल धानोरकर ,शल्य चिकित्सक डॉ.आनंद किन्नाके, डॉ पाचभाई, यांच्या उपस्थीतीत प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील,गृहमंत्री ना.अनिल देशमुख साहेब यांच्या आदेशान्वा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर,परिचारक,सयमसेवक, अशावर्कर,यांच्या मध्ये जिल्हाचे नेते प्रदेश प्रतिनिधाी मुनाज शेख ,तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर,यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
"फेस शिल्ड"(मास्क) वितरण प्रसंगी जिल्हाचे नेते प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख , तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, शहर अध्यक्ष सुनिल महाले ,२ा.कॉ.महीला अध्यक्ष साबिया देवगडे, दुर्गा बिश्वास, पनवेल शेंडे,रोहन कुटेमाटे,संतोष वास्मवार,राष्ट्रवादी डॉ सेल जिल्हा इत्यादींची उपस्थिती होती.
0 Comments