राजगृहाची तोड - फोड करणाऱ्या मनोविकृतांना ठेचुन काढा ;- घुग्घुस काँग्रेसची मागणी



राजगृहाची तोड - फोड करणाऱ्या मनोविकृतांना ठेचुन काढा ;-  घुग्घुस काँग्रेसची मागणी

घुग्घुस(राज्य रिपोर्टर)हनिफ शेख :  मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या बंगल्यावर दिनांक 07 जुलै रोजी दोन अज्ञात मनोविकृतांनी अनधिकृत प्रवेश करून तेथील साहित्याची तोड - फोड करून इमारतीला नुकसान पोहचविला आहे.
राजगृह हे बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा असून देशभरातील नागरिकांच्या आस्थेचे व निष्ठतेचे प्रतीक आहे.

या वाचनालयाला भेट देण्यासाठी दररोज शेकडोच्या संख्येने नागरिक भेटी देतात.
यामुळे समाजमन अस्वस्थ झाले असून नागरिकांत प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे.
आज दिनांक 08 जुलै रोजी घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कमिटी तर्फे जाहीर निषेध करण्यात आले व मनोविकृतांना जन्माची अद्दल घडविण्याची मागणी करण्यात आली.
व दोषींना तात्काळ अटक करावी  अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी कामगार नेते सय्यद अनवर, अनिरुद्ध आवळे, अजय उपाध्ये, सचिन कोंडावार, रंजित राखूनडे, संजय कोवे, देवानंद ठाकरे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments