विद्यापीठ तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा : सदानंद बोरकर नवरगाव येथे कृषि संजीवनी सप्ताह निमीत्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन


विद्यापीठ तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा : सदानंद बोरकर
नवरगाव येथे कृषि संजीवनी सप्ताह निमीत्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चंद्रपूरदि.8 जुलै(राज्य रिपोर्टर) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठअकोला अंतर्गत विभागीय कृषि संशोधन केंद्रसिंदेवाही येथे कृषि विषयक तंत्रज्ञान विकसीत होते व त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी स्वतःचे शेतावर केल्याशिवाय पारंपारीक पध्दत, सुधारीत पध्दत यातील फरक अनुभवास येणार नाही आणि जोपर्यंत अनुभव गाठीशी नसेल तोपर्यंत आत्मविश्वास वाढणार नाही. विद्यापीठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये करून उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी सदानंद  बोरकर यांनी केले. नवरगाव येथे कृषि संजीवनी सप्ताह निमीत्य कृषि संशोधन केंद्रानी आयोजीत केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शीका सहयोगी प्राध्यापक डॉ. उषा डोंगरवार यांनी श्रीपध्दत तसेच पट्टा पद्धतीने धान लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन पिकांचे किड व रोग व्यवस्थापन करणे सोपे जात असल्याचे सांगीतले. तसेच धानाचे तणखत व्यवस्थापन व शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक विश्वनाथ कुंटे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजने विषयीची माहिती शेतकऱ्यांना सांगितली.
या प्रसंगी किटकशास्त्रज्ञ डॉ. प्रविण  राठोड यांनी धानावरील प्रमुख किडी व रोग तसेच त्यांच्यामुळे होणारे नुकसान या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच 5 टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची शास्त्रोक्त पध्दत ,शिफारशीत किटकनाशक व बुरशी नाशके संदर्भात माहिती सांगितली.
डॉ. मदन वांढरे यांनी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची पोत व उपलब्ध सिंचन व्यवस्था यावरून आपल्या शेतामध्ये कोणते धान पेरणी योग्य राहील यावर तसेच विद्यापीठ निर्मीत धानाच्या किड व रोग प्रतीकारक विविध जाती व बिजप्रक्रिया या विषयी मार्गदर्शन केले. डॉ.पारिष नलवडे यांनी कृषी यांत्रीकीकरणाची गरज व त्याचे महत्व विषद करून धान लागवडीमध्ये वापर करण्यात येणाऱ्या वेगवेगळया आधुनिक अवजारांचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठअकोला अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्रसिंदेवाहीच्या वतीने नुकताच नवरगाव येथे हरीत क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्य कृषी दिन तथा कृषी संजीवनी सप्ताह नवरगाव येथील प्रगतशिल शेतकरी सदानंद बोरकर यांच्या शेतावर साजरा करण्यात आला.
कोवीड-19 च्या पार्श्वभुमीवर काळजी घेऊन शेतावरच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी नवरगांवधुमनखेडा व शिवणी  गावातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments