महाराष्ट्र प्रदेश यूवक कांग्रेस मार्फत युवा नेते कादर शेख यांच्या नेतृत्वात खासदार बालू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्य भव्य रक्तदान शिबिर संपन्न
🔸42 रक्तदात्यांनी रक्तदान करुण दिला सामाजिक कार्यात हाथभार
चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सचिव युवा नेते मोहम्मद कादर शेख यांच्या नेतृत्वात कांग्रेस शहर अध्यक्ष रामु भैया तिवारी यांच्या मार्गदर्शनात खासदार बालू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवस निमित्य आयोजित रक्तदान शिबिरात 42 रक्तदात्यांनी केले .
कोविद 19 महामारीच्या काळात रक्ताचा अल्प पुरवठा लक्षात घेता आज दिनांक 4 जुलाई रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तदान विभाग येथील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवक कांग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. पूर्ण 42 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी केले.
रक्तदात्यांचे मनोबल वाढविण्यासाठी यावेळी शहर अध्यक्ष कांग्रेस रामु भैया तिवारी,अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष अधिवक्ता शाकिर मलक, शोहेल शेख, युवा नेते कुनाल चहारे, प्रसन्ना शिरवार, पप्पु सिद्दीकी, राजू वासेकर, हाजी ईमरान उपस्थिती दर्शवून सर्वांचे मार्गदर्शन केले व शिबिरास शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयोजक युवा नेते कादर शेख व रक्तपेढी चे प्रभारी यांनी उपस्थित रक्तदात्यांचे आभार मानले.
या कमी वेळात सर्व समाजसेवकांनी परिश्रम घेऊन शिबीर यशस्वी केले व सुरक्षित अंतर ठेवून संपूर्ण कार्यक्रम पार पाडला. महत्वाचे म्हणजे या शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोनू रामटेके ,अरुण शेट्टी ,जावेद शेख , सूरज लांडे, निहाल शेख, आशिष अलोने , प्रणय जेनेकर, सुमेर शेख परिश्रम घेतले.





0 Comments