जेसिआई राजुरा रॉयल तर्फे प्लास्टिक मुक्त दिवसाचे आयोजन
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे बंद करा - अध्यक्षा जेसिआय राजुरा रॉयल
राजुरा (राज्य रिपोर्टर) राकेश कलेगुरवार : पर्यावरण आणि मानव-पशूंच्या आरोग्यास हानीकारक ठरलेल्या प्लास्टिकचा वापर अजून हि संपलेला नाही,
भाजीवाला, फळवाला, किराणा दुकान, खाद्य वस्तू विक्री दुकान, औषधे आदी सर्वच ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. याच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून टाकाऊ अन्न वा वस्तू लोक फेकून देतात.त्यामुळे प्राण्यांचे जीवन धोक्यात येते. अनेकदा घशात अथवा श्वास नलिकेत अडकून प्राण्याचा मृत्यूही होऊ शकतो. जमिनीत अथवा पाण्यात असले तरी प्लास्टिक नष्ट होत नाही. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते.
म्हणूनच 3 जुलै रोजी संपूर्ण भारत देशात "नो प्लास्टिक डे" साजरा करण्यात येतो.याच निमित्ताने जेसिआई राजुरा रॉयलच्या सदस्यांनी लॉक डाऊन च्या काळात आपापल्या परिसरातील गरजू लोकांना कापडी पिशव्याचे वितरण करून त्यांना प्लास्टिक च्या पिशव्या न वापरण्याचा सल्ला दिला.विशेषतः जेसिआई राजुरा रॉयल च्या अध्यक्षा सुष्मा शुक्ला यांनी सिंधी या गावात अनेक महिलांना कापडी पिशव्याचे वितरण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआई राजुरा रॉयल्स च्या अध्यक्षा जेसी सुषमा शुक्ला ,सचिव सुनंदा तुंबडे, ज्योती देऊरकर,डॉक्टर क्षमा बोढे, जयश्री शेंडे ,सुशीला पोरेड्डीवार, रेखा बोढे, राखी यामसनिवार, शेर्ली हाडके ,स्मृती व्यवहारे, मधुस्मिता पाढी , मीना महतो, प्रफुल्ला धोपटे ,शारदा भगत, मनीषा पुन , अश्लेषा चव्हाण, तनु वासे इत्यादींनी सहकार्य केले.



0 Comments