वन निवासी आदीवासींना जबरदस्तीने भुमीहीन करणे थांबवावे व जंगल निवासी आदीवासींना पट्टे देण्यात यावे



 सपुर्ण जिल्हा मध्ये वन निवासी आदीवासींना जबरदस्तीने भुमीहीन करणे थांबवावे व जंगल निवासी आदीवासींना पट्टे देण्यात यावे व शेती करण्यास अळथडा निर्मान करु नये शासनाच्या आदेशा प्रमाने सरसकट कर्ज माफी करण्यात यावी.

दाताळा येथील पूलाला राजमाता हीराई यांचे नाव देण्याबाबद 

एप्रील ते जुन महीन्यापर्यंत चा विद्यूत ग्राहकांचे विज बील माफ करण्या बाबद.

रेती घाटाचा लिलाव करुन गरजु नागरीकांना रेती पुरवठा करण्या बाबद.

चंद्रपुर (राज्य रिपोर्टर) :  दि.१ जुलै २०२० रोजी स्वराज्य क्रांती फाऊंडेशन व गोंड राजे खांडक्या बल्लारशहा यांचे १५वे वंशज केशवशहा राजे आत्राम यांच्या नेतृत्वात मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपुर यांना प्रजेच्या समस्या जानवुन  देण्यासाठी काही निवेदन सादर करण्यात आले. कोरोणा महामारीने संपुर्ण जगात आपले थैमाण घातले असताना सर्व समाजातील कामगारांचा रोजगार नष्ठ झाला आहे, व सर्व समाजातील गरिब नागरिक आर्थिक दृष्टीने  जर्जर झाले आहे, आश्याच परिस्थित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे बल्लारपूर शहरातील विज ग्राहकांना एप्रिल व मे या दोन  महिन्याचे १० ते १९ हजार रूपये विज बिल पाढवून हाहाकार माजविला आहे. एकीकडे कोरोणा महामारीणे कुटुंबाचे पालन पोषण करणे कठीण झाले आहे तर दुसरीकडे विद्युत कंपनीने  त्रस्त केले आहे.
तर दोन वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील ऐकून पंधरा तहसिल मध्ये आता पर्यंत शासनातर्फे रेती घाटाचा लिलाव करण्यात आला नाही, त्यामुळे शहरातील रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुलाचे बांधकाम अर्धवट राहीले आहेत, तसेच अनेक खाजगी घरांचे बांधकाम थांबले आहे. रेती घाटाचे लिलाव न झाल्या मुळे ट्रॅक्टर चालक अवैध रित्या रेती वाहक करून ५हजार रूपये प्रति ट्रॅक्टर प्रमाणे विक्री करत आहे या मुळे काळे बाजारी सुद्धा वाढत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दाताळा येथे नवीन केबल पुलांचे बांधकाम प्रगती पथावर आहे, हा पुल पुर्ण झाल्यावर चंद्रपूर शहराकडे नवीन ओळख तसेच वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून पाहिले जाईल, म्हणजे  चंद्रपूर शहराची निश्चीतच भव्यता वाढेल. अश्या प्रकारे चंद्रपूर शहराची निर्मिती ते विकास यांचा विचार केले असता राजमाता हिराई चे योगदान विसरता येणार नाही. म्हणून निवेदनाचा माध्यमातून आपनास नम्र विनंती आहे की, दाताळा येथील पुलाला राजमाता हिराई यांचे नाव देऊन त्यांचा व महीला वर्गाचा योग्य सन्मान केल्या प्रमाणे होईल व शहराच्या इतिहासाला नविन उजाळा मिळेल.

 तर या सर्व निवेदनात प्रमुख मांगणी म्हटली तर संपुर्ण जिल्हात आदीवासी व गैर आदीवासी जिल्हात 15/20 वर्षा पासुन अतीक्रमन शेती करीत आहेत. जिल्हातील वन परीक्षेत्र अधीकारी वरीष्ट  अधीकारी सुद्धा शेता मध्ये जाऊन जिवे मारण्याची व पाळीव जनावरांना पाॅयजन पाजुन मारण्याची धमकी देत आहेत, शेती सोडुन कुठेही निगुन जान्यास वारंवार त्रास देत आहेत. वनवीभागाणे जंगल निवासी आदीवासी आदीवासींना धमकाऊ नये व त्यांच्या दैनंदीन जिवनात अळथडा निर्माण करु नये,वन विभागाने जंगलातुण मोठ मोठे सागवान कटाई करून डेपोत आनुण बाहेर विक्री अरणे बंद करावी आणी शेतकर्याना न्यायदेण्यात यावा व शासनाच्या आदेशा प्रमाणे शेतकर्यांची कर्ज माफी त्वरीत करण्यात यावी.अण्यथा  एका राज वंशजालाच स्वताच्या राजधानीत आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल तरी आपन योग्य न्याय निवाडा करावा ही नंम्र विनंती. या वेळी गोंड राजे केशवशाह राजे आत्राम यांचे सहकारी डॉ. रफीक बैग, स्वराज्य क्रांती फाऊंडेशन चे अध्यक्ष पराग गुंडेवार, सचिव गौतम कांबळे, सहसचिव रोहित लोनारे, आदित्य जावडेकर, राकेश बहुरिया,संदीप केशकर सह आदि  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments