जे.सि.आय.सास्ती- राजुरा कोलटाऊन च्या वतीने राजुरा नगर परिषद कर्मचारींचा सत्कार
जे.सी.आय.ने विविध कार्यातून देश पातळीवर सामाजिक बांधिलकी जपून ठेवली - मा. अरुणभाऊ धोटे नगराध्यक्ष
राजुरा (राज्य रिपोर्टर ) राकेश कलेगुरुवार : जे.सी.आय. सास्ती राजुरा कोलटाऊन च्या वतीने राजुरा नगर परिषद मधील अग्निशमन सेवा विभागात कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांचा सन्मान सत्कार चा कार्यक्रम आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाला राजूरा क्षेत्राचे लोकप्रिय, दमदार नेतृत्व असलेले विकास पुरुष मा. अरुण भाऊ धोटे नगराध्यक्ष राजुरा .जे.सी.आय. इंटरनॅशनल मुंबई शेत्र जोन-13 चे उपाअध्यक्ष मा. प्रकाश दोतपेल्ली सर , मा. विजय जांभुळकर सर प्रशासकीय अधिकारी नगर परिषद राजुरा,मा.संजय निगम सर पूर्वाअध्यक्ष जे.सी.आय. मा.देवेंद्र दोतपेल्ली सर अध्यक्ष जे सी आय सास्ति- राजुरा कोल टाऊन, यांचा प्रमुख उपस्थितीत व कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमा प्रसंगी अग्निशमन विभागात कार्यरत असलेले 1)दत्तु लक्ष्मण गुरनुले 2)असिफ शेखअल्लाबक्ष 3) आत्माराम खेडेकर यांचा,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुण भाऊ धोटे यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी मा,प्रकाश दोतपेल्ली सर यांनी राज्य व देश पातळीवर विविध उपक्रमातून सामाजिक व शैक्षणिक संबंधीत अनेक कार्य राबवले जात असल्या- बद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ धोटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले अशा प्रकारचे सन्मान करणे व कार्याचा गौरव करणे हे खरोखरच प्रेरणादायी असल्याचे सांगितले व कार्याचे कौतुक केले तसेच जे.सी.आय.ने विविध कार्यातून देश पातळीवर सामाजिक बांधिलकी जपून ठेवली असल्याचे बोलले. याप्रमाणे भविष्यातही आपण आपल्या कर्तव्याचे पालन करून सामाजिक दायित्व जपालअसे आम्हाला खात्री आहे असे सांगून जेसीआय ला धन्यवाद दिले. याप्रसंगी विजय जांभूळकर सर यांनी मार्गदर्शन केले,अध्यक्ष- देवेंद्र दोतपेल्ली सर,व संजय निगम सऱ यांनी सुद्धा मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला स्वप्निल रामटेके व कुमारी मनीषा मून यांनी सहकार्य केले.सदर कार्यक्रमाचे संचालन श्री राकेश कलेगुरवार सर यांनी केले.व सदर कार्यक्रम यशस्वी रित्यासंपन्न झाला.





0 Comments