पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : खा.धानोरकर


पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा  : खा.धानोरकर 

  पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात वरोऱ्यात काँग्रेसची निदर्शने व धरणे  

वरोरा ता.बा.(राज्य रिपोर्टर)  : सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी आज केली.पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात वरोरा येथे  कॉंग्रेसतर्फे निदर्शने व धरणे आंदोलन झाले.त्यात खा.धानोरकर यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी सीमांचे रक्षण करण्यास असक्षम ठरले आहे. देशाचे जवान शहीद होत आहे,पेट्रोल डीझेलची भरमसाठ भाववाढ होत आहे.महागाईची झळ सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसत आहे. सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार फेल असून पंतप्रधान मोदी यांनी नैतिकता बाळगून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली. 
महामारीच्या संकटकाळात केंद्र सरकार इंधनाच्या किमती वाढवून जनतेची लुट करीत आहे असे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मनोगत व्यक्त केले.पेट्रोल डीझेलची दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी करीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सुद्धा कमी करण्यात याव्या असे प्रतिपादन केले. या किमती कमी न झाल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही आमदार धानोरकर यांनी दिला.माजी नगराध्यक्ष विलास टिपले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भोयर,बाजार समितीचे सभापती राजेन्द्र चिकटे,पंचायत समिती सभापति रवींद्र धोपटे,नगरसेवक छोटु शेख आदिंनि याप्रसंगी मार्गदर्शन केले.
  नगरसेवक राजू महाजन, पंचायत समिती उपसभापती संजीवनी भोयर,माजी सभापति विशाल बदखल,देवानंद मोरे,गजानन मेश्राम, चंद्रकला चीमुरकर ,मनोज दानव ,रत्ना अहिरकर ,शिरोमणी स्वामी,गिरिधर कष्टी,वसंत विधाते,शकील पटेल,गिरिधर कष्टी,शालिक झाडे,राजू मिश्रा,, देवानंद मोरे, पंकज नाशिककर,शशी चौधरी ,सलिम पटेल,रुपेश तेलंग,सुभाष दांदले,संजय घागी,दिवाकर निखाडे आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.संचालन मनोहर स्वामी यांनी केले.
शहीद डाहुले स्मारक चौकात झालेल्या या आंदोलनात दरवाढी विरोधात नारेबाजी करण्यात आली.यानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments