बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 42; 56 बाधित कोरोना मुक्त


बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य
उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 42;
56 बाधित कोरोना मुक्त

Ø  एकूण बाधितांची संख्या 98
Ø  आतापर्यंत जिल्ह्यात 84 हजारावर नागरिक दाखल
Ø  संस्थात्मक अलगीकरणात 943 नागरिक
Ø  गृहअलगीकरणात 2 हजारावर नागरिक
Ø  81 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण
Ø  सध्या 14 कंटेनमेंट झोन कार्यरत

चंद्रपूरदि. 2 जूलै(राज्य रिपोर्टर): जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य असणार आहे. आतापर्यंत आढळलेले कोरोना बाधित हे बाहेरून आलेल्यांपैकी आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग इतरांना होऊ नये तसेच संसर्गाची चेन खंडित व्हावी यासाठी संस्थात्मक अलगीकरण महत्त्वाचे आहे.नागरिकांनी कोरोना संसर्गाला घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 98 वर पोहोचली आहे. यापैकी 56 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 42 इतकी आहे. 40 बाधित कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे. तर दोन बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. या सर्व बाधितांची प्रकृति स्थिर आहे.
सध्या 14 कंटेनमेंट झोन कार्यरत:
जिल्ह्यात एकूण 39 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.यापैकी25 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. 14 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे. तर एक कंटेनमेंट झोन  सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य तपासणी:
आजपर्यंत एकूण 39 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 64 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 57 नमुने निगेटिव्हएक पॉझिटिव्ह तर 6 नमुने प्रतीक्षेत आहे.कंटेनमेंट झोनमधील सर्व आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब घेण्यात येत आहे. कॅच दि कोरोना व्हायरस या मोहिमेअंतर्गत एकूण 21 बाधित आढळले आहे.
कोविड-19 संक्रमित 98 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातूनरेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -6हरियाणा (गुडगाव)-2ओडीसा-1गुजरात-4हैद्राबाद-8नागपूर-3अकोला-2मुंबई-14ठाणे -3पुणे-6नाशिक -3जळगांव-1यवतमाळ -5औरंगाबाद -4,वाशिम-1प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-7संपर्कातील व्यक्ती - 28 आहेत.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-7बल्लारपूर दोनपोंभूर्णा दोनसिंदेवाही दोनमुल चारब्रह्मपुरी 16नागभीड चारवरोरा पाच बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर चारवरोरा 9राजुरा तीनमुल एकभद्रावती चारब्रह्मपुरी-11कोरपणानागभिडगडचांदूर प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोनबिनबा गेट एकबाबुपेठ तीनबालाजी वार्ड दोनभिवापूर वार्ड एक शास्त्रीनगर  एकसुमित्रानगर चारस्नेह नगर एकलुंबीनी नगर 4जोडदेउळ एक,तुकूम तलाव एक बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 98 वर गेली आहे.
जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती:
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 5 हजार 213 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 98 नमुने पॉझिटिव्ह4 हजार 422 नमुने निगेटिव्ह659 नमुने प्रतीक्षेत तर 34 नमुने अनिर्णीत  आहेत.
जिल्ह्यातील अलगीकरण विषयक माहिती:
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 943 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 189 नागरिक,तालुकास्तरावर 371 नागरिक तरजिल्हास्तरावर 383 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 84 हजार 62 नागरिक दाखल झाले आहेत. 81 हजार 547 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 2 हजार 515 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग विषयी माहिती:
जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 77 कोरोना बाधित आहेत. या 77 बाधितांच्या अति जोखमीच्या संपर्कातील नागरिकांची संख्या 601 आहे. तर कमी जोखमीच्या संपर्कातील नागरिकांची संख्या 361 आहे. महानगरपालिका चंद्रपूर मध्ये 21 कोरोना बाधित आहेत. या 21 बाधितांच्या अति जोखमीच्या संपर्कातील नागरिकांची संख्या 188 आहे. तर कमी जोखमीच्या संपर्कातील नागरिकांची संख्या 171 आहे.
बाधितांची तपासणी पूर्वीची अलगीकरण व लक्षणांवरून संक्षिप्त माहिती:
जिल्ह्यातील 98 बाधितांपैकी गृह अलगीकरणातील 44 बाधितसंस्थात्मक अलगीकरणातील  36 बाधितसारी लक्षणे असलेले तीन बाधिततर आयएललाय लक्षणे असलेले 15 बाधित आहेत.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित )13 मे ( एक बाधित)20 मे ( एकूण 10 बाधित )23 मे ( एकूण 7 बाधित)24 मे ( एकूण 2 बाधित)25 मे ( एक बाधित )31 मे ( एक बाधित )2 जून (एक बाधित)4 जून (दोन बाधित)5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित)7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित)10 जून ( एक बाधित)13 जून ( एक बाधित)14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित)16 जून ( एकुण 5 बाधित)17 जून ( एक बाधित)18 जून ( एक बाधित)21 जून (एक बाधित)22 जून (एक बाधित)23 जून (एकूण बाधित चार )24 जून (एक बाधित)25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित)27 जून (एकूण 7 बाधित)28 जून (एकूण 6 बाधित)29 जून (एकूण 8 बाधित)30 जून (एक बाधित) आणि 1 जूलै (एकूण दोन बाधित)अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 98 झाले आहेत. आतापर्यत 56 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  98 पैकी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या  बाधितांची संख्या आता 42 आहे.

Post a Comment

0 Comments