जिल्हा क्रीडा संकुलाची दुरुस्ती व देखभाल नियमानुसार : अनंत बोबडे


जिल्हा क्रीडा संकुलाची दुरुस्ती व देखभाल नियमानुसार : अनंत बोबडे

चंद्रपूर, दि 30 जून (राज्य रिपोर्टर) : जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या दुरुस्ती व देखभाल संदर्भातील सर्व कामे नियमानुसार असल्याचा खुलासा जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी केला आहे.
यासंदर्भात  महेंद्र कपूर यांना देण्यात आलेले कंत्राट नियमानुसार आहे. जिल्हा क्रीडा संकुल समिती चंद्रपूर अंतर्गत जिल्हा स्टेडियम मधील सर्व कंत्राट व कार्य जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील समितीमार्फत केले जाते. महेंद्र कपूर हे गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असून राज्य शासनाच्या वतीने त्यांची विविध ठिकाणी आतापर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पूर्वानुभव असल्यामुळे त्यांना जलतरण तलाव चालविण्यासाठी भाडेतत्वावर देण्यात आला होता. जलतरण तलावामध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्या देखील नियमानुसार करण्यात आल्या असून मार्च 2020 मध्ये त्यांच्या सोबतचा करार संपला असल्याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments