पक्षभेद विसरून केला कार्यकर्तायांचा सत्कार. बल्लारपुर शहरातील नगरसेवकाने केला सत्कार


पक्षभेद विसरून केला कार्यकर्तायांचा सत्कार                 
बल्लारपुर शहरातील नगरसेवकाने केला सत्कार     
    शहरात एकही नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधि नसताना सुध्दा त्यांच्या माध्यमातुन सदर कार्य अविरत पणे सुरु  

बल्लारपुर (राज्य रिपोर्टर):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास मागील 2 महिन्यापासुन अनेक गरजवंताना भोजनदान व मूलभूत गरजांची पूर्तता करत असलेल्या कार्यकर्ता चा सत्कार बल्लारपुर शहरातील नगरसेवकाने केला आहे याविषयी मिळालेल्या माहितीनुसार आज 31 मे 2020 ला बल्लारपुर शहरातील महाराणा प्रताप नगरातील नगरसेवक स्वामी रायबरम यांनी आम आदमी पार्टी चे बल्लारपुर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ता चा सत्कार केला.

 आम आदमी पार्टी बल्लारपुर च्या वतीने कोरोनाच्या संक्रमण काळात लॉकडाउन घोषित झाल्यापासुन रोज शहरातील 17 वार्ड मधील 800 पेक्षा जास्त गरजवंताना निशुल्क भोजनदान देण्यात येते विशेष बाब म्हणजे आम आदमी पक्षाचा शहरात एकही नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधि नसताना सुध्दा त्यांच्या माध्यमातुन सदर कार्य अविरत पणे सुरु रहावे तसेच आम आदमी पार्टी बल्लारपुर शाखा द्वारे करण्यात येणाऱ्या कार्यामुळे कुणीही नागरिक प्रभावित होवू शकतो.

 तसेच आम आदमी पार्टी बल्लारपुर ही सदैव जनतेच्या सुखः दुखांत सहभागी राहील अशी अपेक्षा करतो यावेळी आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा संघटन मंत्री परमजीत सिंह झगळे, बल्लारपुर शहर संयोजक बलराम केशकर, शहर सह संयोजक रवि पप्पूलवार, शहर सचिव आसिफ हुसैन, संघटन मंत्री नंदकिशोर सिन्हा, मनीष नागापुरे, अजय क़सारे, अवधेश तिवारी, शमशेरसिंग चौहान, दिनेश जैस्वाल, जितेंद्र यादव, राजू अरनकोंडा, कमलेश देवईकर ई कार्यकर्ता यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला वर्तमान स्थितित अनेक व्यक्ति सत्कार साठी हपापलेले दिसतात शिवाय अनेक संघटना सत्काराच्या माध्यमातुन प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करतात अशावेळी पक्षभेद विसरून जनतेच्या सेवेत आपले सर्वस्व अर्पण करीत असलेल्या प्रामाणिक कार्यकर्ता यांचा सत्कार बल्लारपुर शहरात करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments