दारू पिताना झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
पुणे (राज्य रिपोर्टर) : दारू पिताना झालेल्या वादातून तिघांनी तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे.
फैय्याज शेख (वय २७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
काही वेळापूर्वी ही घटना घडली असून, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद आणि त्याच्या ओळखीतील काही मुले आंबेडकर शाळेच्या मैदानात दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. तसेच त्यानंतर तेथून पसार झाले. काही वेळानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तो फैय्याज शेख असल्याचे. आरोपी पसार झाले असून, पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
0 Comments