प्रशासना कडून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ युवासेने द्वारा सोसिएल मेडियावार आंदोलन


प्रशासना कडून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ युवासेने द्वारा सोसिएल मेडियावार आंदोलन

औरंगाबाद, (राज्य रिपोर्टर) : संभाजीनगर येथे संचार बंदी च्या  काळामध्ये कोरोना संसर्गाने शहरामध्ये थैमान मांडले आहे दिवसें दिवस कोरोना सारखा रोग औरंगाबाद शहरांमध्ये वाढत चालला आहे तरीही  प्रशासनाचे या गोष्टी कडे दुर्लक्ष केलेलं अहेत  याउलट दिव्य मराठी चे संपादक व पत्रकार ज्यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले जाते ते प्रामाणिक पने आपले कर्तव्यची अंमलबजावणी करतात तसेच कोरोनाच्या काळातील शहरातील विविध समस्यांवर लक्ष ठेवतात व त्या समस्या जाणतेच्या समोर मांडतात तरीही प्रशासनाने निर्दयपणे या पत्रकारांवर व संपादकांवर गुन्हे दाखल केलेले आहे.

आज कोरोनाच्या संकटामुळे औरंगाबाद शहर तसेच पूर्ण जिल्हा संकटात सापडलेला आहे व प्रशासनाने त्यावर उपाययोजना करायच्या सोडून प्रशासन आपले अपयश लपवण्यासाठी अशा वेगळ्या गोष्टी कडे लक्ष देत आहेत त्यामुळे युवा सेना द्वारा युवा सेनेचे शहर सचिव अक्षय खेडकर यांनी प्रशासनाला अशी मागणी केली आहे दिव्य मराठी व त्यांच्या पत्रकार दाखल केलेले गुन्हे तावरीत मागे घ्यावे.

तसेच दिव्य मराठीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर युवासेनेचे शहर सचिव अक्षय खेडकर व इतर पदाधिकाऱ्यांनी  या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करत  सोशल मीडिया द्वारा We Support to Media  हे कॅम्पेनिंग social media च्या माध्यमातून फेसबुक ,ट्विटर,इंस्टारग्राम येथे चालवले  आहे तसेच पत्रकारांच्या या सोसिएल मीडिया कॅम्पेनिंग मध्ये शहरातील तरुण तरुणाई  ज्येष्ठ नागरीक , महिला स्वतः च्या हातामधे फलक घेऊन सोशल मिडीयाद्वारे प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
 
त्यामुळेच युवासेने दिव्यमराठीच्या पत्रकारांना व शहरातील सर्व पत्रकारांना पाठिंबा देऊन युवासेनेचे शहर सचिव अक्षय खेडकर यांनी खंबीरपणे असेही सांगितले की की कोणत्याही परिस्थीतीत आम्ही आपल्या सोबत आहोत कोणत्याही दबावाला घाबरण्याचे कारण नाही जनतेचे प्रश्‍न योग्यरीत्या आपण मांडतात व  मांडत आल हा विश्‍वास युवा सेनेला आपल्या कडून आहे त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या facebook twitter instagram  आंदोलनामध्ये शहरातील तरुणांनी व नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला हे आंदोलन युवासेना शहर सचिव अक्षय खेडकर यांच्या नेतृत्वाखाली विकास गोले शिवाजी टोपे अजय सोनवणे प्रशांत कोरे व इतर युवा सेने चे पदाधिकारी सहभागी झाली.

Post a Comment

0 Comments