दिव्यांग योजनेचा निधी तात्काळ देण्यात यावा -राजु झोडे




दिव्यांग योजनेचा निधी तात्काळ देण्यात यावा -राजु झोडे

स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत देण्यात येणारा दिव्यांग योजनेचा थकित ५ टक्के निधी देण्याची दिव्यांगांनी केली मागणी.

  बल्लारपुर,राज्य रिपोर्टर : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांच्या स्वयंरोजगारासाठी व त्यांना आर्थिक आधार म्हणून पाच टक्के निधी योजना असते. या 5% निधीच्या योजनेतून दिव्यांग आपला रोजगार व स्वयंरोजगार तयार करून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असतो. परंतु बल्लारपूर येथील नगरपरिषदेने सन 2018 ते 2019 पर्यंतचा दिव्यांग योजनेचा पाच टक्के निधी अजूनही दिव्यांगांना दिलेला नाही. याकाळात कोरोना चे महासंकट व त्यामुळे बुडालेला रोजगार यामुळे दिव्यांगांचे व त्याच्या परिवाराचे प्रचंड हाल होत असून दिव्यांगांसमोर जीवन जगण्याचा मोठा प्रश्न पडलेला आहे. जवळपास तीन महिने लाॅकडाऊन सुरू होता परंतु आता अनलाॅकडाऊन सुरु झालेला आहे तरी रोजगार व स्वयंरोजगार दिव्यांगांना मिळण्यासाठी सन 2018 ते 2019 चा पाच टक्के निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी व बल्लारपूर येथील दिव्यांगानी मुख्य कार्यकारी अधिकारी बल्लारपूर यांच्याकडे केली आहे.
     जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही नगर परिषदेसमोर आंदोलन करू असा इशारा दिव्यांगांनी नगर प्रशासनाला दिला. निवेदन देतांना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, विकास भगत, सुभाष जोडांगळे, धीरज झाडे, भास्कर मंथनवार, सावन इटनकर, रजनी रामटेके, रूपा राठोड राखी अमृतकर तथा अन्य दिव्यांग उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments