पर्यायी रस्ता उपलब्ध न केल्यास कोळसा वाहतूक रोखणार : खासदार बाळू धानोरकर


पर्यायी रस्ता उपलब्ध न केल्यास कोळसा वाहतूक रोखणार : खासदार बाळू धानोरकर 

चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : वेकोली खदान एकोना येथून जीएम आर व साई वर्धा वीज कंपन्यांना होणारी कोळसा वाहतूक वरोरा शहरांतून न करता मौजा वनोजा येथून एम. आय. डी, सी. मार्गे करण्यात यावी.  यासाठी वरोरा अतिथीगृहात आज खासदार बाळू धानोरकर यांनी  बैठकीला घेतली. त्यात वरोरा उपविभागीय अधिकारी शिंदे, जी. एम. आर कंपनीचे विनोद पुसदकर, साई वर्धा पॉवर कंपनीचे प्लांट मॅनेजर जोशी, वेकोली एकोना चे सब एरिया अहमद उपस्थित होते.
मागील काळात वेकोली खदान एकोना येथून जीएम आर व साई वर्धा वीज कँपन्यांना होणारी कोळसा वाहतूक वरोरा शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरु आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघातात अनेकांना अपंगत्व आले आहे. अशा प्रकारे जीव मुठीत घेऊन प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यासोबतच वरोरा शहरातून होणाऱ्या कोळशाच्या जड वाहतुकीमुळे नागरीकांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊन जीवितास धोका निर्माण होत असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिले.  
नेहमी जनसामान्यांचे प्रश्न घेऊन लढणारे खासदार बाळू धानोरकर हे वरोरा येथील जनतेच्या समस्यांवर देखील गंभीर असल्याचे दिसून येत आहेत. हा प्रश्न नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषय असल्याने त्वरित निकाली लागण्यासाठी ते आग्रही आहेत. येत्या सात दिवसात वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध न केल्यास कोळसा वाहतूक रोखण्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments