पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी
वरोड्यातील रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद
वरोरा.ता.बा.(राज्य रिपोर्टर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्य रविवार ३१मे रोजी तालुका व शहर भाजपा, भाजयुमो , भाजपा महिला आघाडीच्या वतीने येथील नगर भवनात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असून भाजपतर्फे चंद्रपूर जिल्ह्यात सेवादिन म्हणून साजरा करण्यात आला . या सेवादिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे प्रत्येक तालुका स्तरावर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
वरोडा येथील नगरभवनात सकाळी ९वाजेपासून हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून अहिल्यादेवी होळकर यांच्याप्रती आपला आदर व्यक्त केला.
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मार्चा आणि भाजपा महिला आघाडी यांच्या माध्यमातुन जिल्हाभर हे रक्तदान शिबीर संपन्न झाले . कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढयांमध्ये जाणवत असलेला तुटवडा दूर करण्याच्या दृष्टीने हे रक्तदान शिबीर सेवा म्हणून आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबीरात सोशल डिस्टंसींगचे पालन करण्यात आले हे विशेष.
रक्तदान करणा-यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या . रक्तदात्याचा वाढता ओघ पाहता व अपेक्षेपेक्षा जास्त बॅग रक्त संकलित झाल्याने शिबीर आटोपते घेण्यात आले.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढी विभागाचे डाॅ. स्वप्नील चांदेकर यांच्या नेतृत्वाखाली संजय गावीत, गणेश जाधव, योगेश सुतार, अभिजित फोफळे, बंटी गेडाम यांचे सहकार्य लाभले .
या रक्तदान शिबीरात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले होते .
रक्तदान शिबिरात वरोरा न.प.चे नगराध्यक्ष अहेतेशाम अली , जिल्हा भाजपा उपाध्यक्ष बाबा भागडे, वरोरा तालुका भाजपाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, तालुका महामंत्री रवि कष्टी, वरोरा शहर अध्यक्ष सुरेश महाजन, नगरसेवक डॉ. गुणानंद दुर्गे, नगरसेवक अनिल साखरिया ,सुनिता काकडे , पंचायत समितीच्या माजी सभापती रोहीणी देवतळे ,भाजपा युवा मोर्चाचे अमित आळेकर आदी सर्व भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.




0 Comments