WCL बल्लारपूर उपक्षेत्र क्षमता 1.50 लाख लिटर पानी टंकी कॉलरी काटा गेट जवळ जीर्ण अवस्थेत


WCL बल्लारपूर उपक्षेत्र क्षमता 1.50 लाख लिटर पानी टंकी कॉलरी काटा गेट जवळ जीर्ण अवस्थेत
बल्लारपुर कॉलरी परिसरातील पानी टँकी दुरुस्ती करावी
जीर्ण अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना इजा होण्याची शक्यता


बल्लारपुर(राज्य रिपोर्टर) : बल्लारपुर शहरातील लोकमान्य टिळक वार्ड परिसरात असलेली व कॉलरी मार्ग व कॉलरी ग्राउंड जवळ असलेली बल्लारपुर उपक्षेत्र व कॉलरी परिसराला पाणी पुरवठा करणारी पाणी टँकी ही जीर्ण झाली असून त्या टँकीला दुरुस्ती करणे गरजेचे आहे या पाण्याच्या टँकीचा सभोवतालचा वरील भाग जीर्ण असल्यामुळे अल्प प्रमाणात कोसळत आहे एखादे वेळी कुण्या नागरिकांना हानी पोहोचन्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय.

 या टँकीच्या लगतच मुख्य मार्ग असून या मार्गावरुन अनेक मजूर कामावर जात असतात व सदर पाणी टँकी रस्त्याच्या लगतच असल्यामुळे कोणतीही हानी होण्याची शक्यता आहे तरी या टँकीच्या सभोवताल जाळी बसविन्यात यावी शिवाय या पाण्याच्या टँकीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी टिळक वार्ड स्थित पानी टँकी परिसरात राहणाऱ्या नागरिकानी केली आहे.

Post a Comment

0 Comments