मुंबई ,पुण्यातील पञकारांचे कार्य उत्तम तर पञकारांच्या अङचणी सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यास कटीबध्द - प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे.
नितीन जाधव मंञालय प्रतिनिधी
मुंबई,(राज्य रिपोर्टर) : दिनांक २४ मे रोजी महाराष्ट् राज्य पञकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे व मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी आयोजित केलेल्या व्हीसी चर्चेत पुणे तसेच मुंबईतील पञकारांनी सहभाग घेतला होता. यात झूम अॕप द्वारे पहिल्यांदाच व्हीसी ग्रुप वर आॕनलाईन थेट संवाद साधण्यात आला. तेव्हा प्रथम नवी मुंबईतील पदाधिकार्याशी अध्यक्षांनी थेट संवाद साधत त्यांच्या अङचणी जाणुन घेतल्या व कोरोनाच्या संकटातील संघाची भूमिका व कार्यक्षेञातील कामाची विचारपूस केली तसेच संघटना म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले.या वेळी नवीमुंबई अध्यक्ष राजेंद्र बोडके व्हीसीत सहभागी होते.तर पुणे जिल्ह्यातील काही तालुका अध्यक्ष तसेच पुणे उत्तर व पुणे दक्षिण जिल्हाअध्यक्ष उपस्थित होते.या वेळी सुरुवातीला महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव यांनी पुण्यातील पञकारांना व्हीसी वर आमंञित केले तसेच संघटनेचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी कोरोना काळात राज्यभरात संघटनेने राबवलेले उपक्रम त्यात गरजूना किराणा माल वाटप ,धान्यवाटप ,जीवनआवश्यक वस्तू वाटप अन्नदान ,मास्क ,सॕनिटायझर वाटप ,मजूरांची निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था यावर राज्य विभागवार विवेचन केले व उत्कृष्ट कामामुळे संघटनेची राज्यभर ओळख निर्माण झालेचे स्पष्ट केले.संघटनेच्या जिल्हाअध्यक्ष विभाग अध्यक्ष व सदस्यांचे बद्दल गौरव उद्गार काढले आनंद व्यक्त केला . पुणे जिल्ह्यातील उत्तरपुणे तसेच दक्षिण पुणे भागातील शिरूर ,इंदापूर आंबेगाव ,बारामती ,जुन्नर ,पिंपरीचिंवड मधील पदाधिकार्यांनी व्हीसीत सहभाग घेत प्रदेशाध्यक्षाबरोबर वैयक्तिक चर्चा केली. सुरुवातीला चर्चेत उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे यांनी आंबेगाव,खेड ,मंचर, जुन्नर सह पिंपरीचिंचवड भागात राबविलेले उपक्रम सांगितले .पिंपरीचिंचवड येथे कोरोना काळात भव्य रक्तदानशिबीर आयोजन केले,अन्नधान्यकीट वाटप,सॕनिटायझर ,मास्क वाटप केल्याचे शिंदे यांनी नमूद केले तर आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी नितीन शिंदे व पराग कुंकूलोळ यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या वेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ देशकर यांनी सर्वच पञकारांना होमिओपॕथिक गोळ्या वाटप करण्याचा मुद्दा मांडला त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला व महाराष्ट्रभर या गोळ्या पोहच करण्याची योजना राबवणार असल्याचे सांगितले .दरम्यान आंबेगावात 1200 कुटूबांना जीवनआवश्यक वस्तू धान्य वाटप सह मास्क वाटप केल्याचे आंबेगाव अध्यक्ष समीर पठाण यांनी सांगितले .तसेच इंदापुर मध्ये संघाने केलेल्या कामाचा ऊहापोह जेष्ठ पञकार मधुकर गलांडे , सागर शिंदे , अध्यक्ष निलकंठ मोहीते यांनी केला .इंदापुरात कोरोना काळात पञकार संघाने उत्कृष्ट कार्य केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष मुंडे यांनी इंदापूर पञकार संघाचे कौतुक केले. तसेच बारामतीत प्रेस वृत्तपञ बंद असल्यामुळे अङचणी निर्माण होत असून पञकार संघ कोरोना साथीत समाजसेवा जोपासत असल्याचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी सांगितले .जुन्नर येथे किराणा साहित्य कीट वाटप झाल्याचे नवनाथ जाधव यांनी दृष्टीपथास आणून दिले,तसेच दक्षिण पुणे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी शिरुर, दौंड,हवेली सह इतर ठीकाणी कोरोना काळात संघाने सहभाग घेत समाजसेवा जोपासल्याचे स्पष्ट केले .
या वेळी वसंतराव मुंडे यांना पञकारांच्या अनेक प्रश्नाची उत्तरे द्यावी लागली .चर्चेवेळी पिंपरीचिंचवड चे अध्यक्ष पराग कुंकूलोळ यांनी विमासंरक्षण तसेच पञकार सवलती पॕकेज बाबत शासनाकडे मागणी करण्याची विनंती केली त्यावर पाठपुरावा सुरु आसल्याचे सांगण्यात आले.याशिवाय मधुकर गलांडे यांनी अधिस्वीकृती बाबत विचारलेल्या प्रश्नाला मुंडे साहेबांनी मुद्देसुद उत्तर देत अटी कमी करा व सवलती जास्त देण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचे स्पष्ट केले.त्यात नियमावलीत अनेक बदल केले असुन कोटा पध्दत कमी केली अटी कमी केल्याचे सांगितले . मुख्यमंञी यांचेकडे पॕकेज सह सवलती तसेच वेबपोर्टल , डिजीटल मिडीयाला अधिकृत शासकीय स्थान मिळण्या बाबत पाठपुरावा सुरु असल्याचे मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी चर्चेत स्पष्ट केले.
एकंदरीतच झूम द्वारे राबवलेल्या व्हीसी संवाद चर्चेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.



0 Comments