बल्लारपुर स्पोर्टस व कल्चरल असोसिएशन च्यावतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी चा सत्कार।
सत्कार करण्याचा मुख्य उद्देश्य म्हणजे कोरोना या महामारी वर बल्लारपुर शहरात विविध प्रकारच्या उपाययोजना
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : बल्लारपुर शहरातील बल्लारपुर स्पोर्ट्स व कल्चरल असोसिएशन च्या वतीने बल्लारपुर नगर परिषदेचे अध्यक्ष मा. हरीश शर्मा, व मुख्याधिकारी मा विपिन मुद्दा यांचा सत्कार करण्यात आला सदर सत्कारमूर्तिचा सत्कार करण्याचा मुख्य उद्देश्य म्हणजे कोरोना या महामारी वर बल्लारपुर शहरात विविध प्रकारच्या उपाययोजना राबवून या शहराला कोरोनापासुन मुक्त ठेवन्यास कार्य तर केलेच शिवाय कोरोना संक्रमण काळात कुणीही उपाशी पोटी राहु नये याकरिता प्रशासनाच्या वतीने भोजनाची व्यवस्था सुध्दा केली तसेच बाहेरुन येणाऱ्या निराश्रित नागरिकांसाठी बचत भवन परिसरात रैनबसेरा ची सोय उपलब्ध करून दिली यासोबतच पक्षाने दिलेली चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष(ग्रामीण) च्या जबाबदारी सोबतच बल्लारपुर नगराध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वी पणे सांभाळताना पूर्ण वेळ कोरोना योद्धाच्या सोबत राहून शहरातील व्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला याचा परिणाम असा आहे की बल्लारपुर शहरात स्थानिक स्तरावर एकही कोरोनाबाधित वा पोजिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही व यामुळेच मा.विपिन मुद्दा, मुख्याधिकारी, बल्लारपुर व मा.हरीश शर्मा नगराध्यक्ष बल्लारपुर यांचा बल्लारपुर स्पोर्ट्स व कल्चरल असोसिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी या संघटनेचे सभासद प्रमोद भाऊ आवते, खान सर्, महेंद्र भोंगळे, श्रीनिवास सर, चौहान सर, पिंटू नींदेकर, राहुल चेनेकर, रमेश खलील ई ची उपस्थिति होती.




0 Comments