बल्लारपुर पोलिसांची कारवाई 5,96000 रु ची दारू पकडली 2 आरोपी अटकेत, 1 फरार


बल्लारपुर पोलिसांची कारवाई 5,96000 रु ची दारू पकडली
2 आरोपी अटकेत, 1 फरार
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाउन च्या काळात अवैध दारूवर नियंत्रण आले होते मात्र या काळात थोड़ी मोकडिक का मिळाली तर अवैध दारुची विक्री सुरु झाली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अंतर्गत बल्लारपुर पोलिसांनी कारवाई करून विदेशी दारू व वाहनासह ऐकून 5,96000 (5 लाख 96 हजार रु) ची दारू पकडण्यात आली आहे सदर कारवाई करतांना 2 आरोपी अटकेत आहेत तर 1 फरार होंन्यात यशस्वी झाला आहे.
         याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार बल्लारपुर शहरातील संतोषी माता वार्ड परिसरात आज 26/05/2020 ला दुपारच्या सुमारास MH-34 AA-5333, मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रँगाची स्विफ्ट कार मध्ये अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त सूचने दवारे मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापडा रचुन कारवाई करतांना सदर माल जप्त केला यावेळी कारवाई करतांना सावन प्रल्हाद वाळके - 45 वर्ष, रा संतोषी माता वार्ड बल्लारपुर, प्रल्हाद भाटू राठोड़ - 56 वर्ष, रा. रविन्द्र नगर वार्ड बल्लारपुर सदर 2 आरोपी अटकेत आहेत तर उमेश राऊत - 30 वर्ष, रा. रविन्द्र नगर वार्ड बल्लारपुर सदर व्यक्ति पसार झाला आहे यावेळी बल्लारपुर पोलिसांनी सापळा रचुन कारवाई केली असता या वाहनामध्ये मागील सिटवर दोन पांढऱ्या रंगाच्या चुंगड़ी, व डिक्की मध्ये 5  चुंगड़ी मध्ये विदेशी दारू चा अंदाजीत 96,000 रु चा माल व 5,00,000 लाख रु चे वाहन असा एकूण 5,96,000 रु चा दारूसाठा जप्त करण्यात आला सदर कारवाई पोलिस निरीक्षक श्री भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखली विकास गायकवाड़ सहायक पोलिस निरीक्षक, स्वप्नील पोशी, सैनिक धर्मेंद्र पोशी ई सह करण्यात आली व यासबंधिचा पुढील तपास बल्लारपुर पोलिस करीत आहे.

Post a Comment

0 Comments