बल्लारपूर मध्ये 340 पोती तांदूळ जप्त !
240 कट्टे (50 किलो प्रति कट्टा) आणि 100 बॅग (25 किलो प्रति बॅग) याप्रमाणे अंदाजे 160 क्विंटल अन्नधान्य साठा आढळून आला.
सदर दुकान (गाळा) हे विनोद बुटेल नावाच्या
240 कट्टे (50 किलो प्रति कट्टा) आणि 100 बॅग (25 किलो प्रति बॅग) याप्रमाणे अंदाजे 160 क्विंटल अन्नधान्य साठा आढळून आला.
सदर दुकान (गाळा) हे विनोद बुटेल नावाच्या
बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने कोणतीही व्यक्ति उपाशी पोटी राहु नये या अनुषंगाने प्रत्येक रेशनकार्ड धारकाला गहू व तांदूळ वाटप करण्यात येत होते शिवाय ज्या रेशनकार्ड धारकाना बायोमेट्रिक केले नसेल अशाही कार्ड धारकाना रेशन उपलब्ध करून देण्यात आले मात्र काही साठेबाजा कडून अवैध रित्या जमा केलेला अन्न धान्याचा साठा जप्त करन्यात आला.
बल्लारपूर मध्ये कोरोनाचे 3 पॉसिटीव्ह पेशंट आढळले.त्यामुळे प्रशासन व पोलिस कंटेनमेंट झोन मधे अडकून पडले आहेत.अशावेळी अन्नधान्याचा साठा सारखं समाजविघातक कृत्य करणारे या संधीचा फायदा घेऊ पाहत आहेत. अशां प्रवृत्तीला एक जोरदार हादरा आज बसला.
खबऱ्यां मार्फत माहिती मिळाल्याने दिनांक 25 मे 2020 रोजी उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांनी कोठारी येथील पोलीस स्टेशन जवळील विविध कार्यकारी सोसायटी च्या एका गोदामावर छापा टाकला. त्यामध्ये त्यांना 240 कट्टे (50 किलो प्रति कट्टा) आणि 100 बॅग (25 किलो प्रति बॅग) याप्रमाणे अंदाजे 160 क्विंटल अन्नधान्य साठा आढळून आला.
सदर दुकान (गाळा) हे विनोद बुटेल नावाच्या एका स्थानिक पुढार्यांचे आहे. बुटेल कडे अधिकृत साठा करण्याचे परवाने बद्दल विचारले असता त्याने कोणताही परवाना सादर केला नाही. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पंचनामा,बयान घेऊन पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पुरवठा अधिकारी भारत तुंबळे यांच्या फिर्यादीवरुन अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा 1955 च्या कलम 7 नुसार नुसार बुटेल यांच्यावर कोठारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई ही नायब तहसिलदार कुळसांगे, तलाठी कन्नके, खरुले यांनी तडीस नेली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांचे नेतृत्वात कोठारी पोलीस करीत आहेत.
दोन्ही तरुण अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई मुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



0 Comments