ऑटो चालकाने मिळालेली सोन्याची चैन केली परत

ऑटो चालकाची इमानदारी मिळालेली सोन्याची चैन

बल्लारपूर:-दि.13मार्च रोजी दुपारी बारा वाजता नवीन बस स्टँड समोरील बँक ऑफ बडोदा जवळ कल्पना दिवाकर खेकारे रहनारे मौलाना आझाद वॉर्ड ही महिला काही कामा निमित्य बँकेत आली होती. बँके जवळ  स्वतःचीअसलेली छोटी पर्स आपल्या थैलीत टाकतानी खाली पडली पण तिला काहीच माहीत नव्हते काही तासाने तिला लक्षात आले की पर्स गहाळ झाली, महिलेने पोलिस ठाण्यात जाऊन एक तोळ ची सोन्याची चैन हरवल्याची तक्रार दाखल केली, पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबविली. ट्राफिक चे पोलीस निलेश माळवे ,महेंद्र कातोरे,वासुदेव टेकाम ,दिनकर पोले यांनी ऑटो चालकांना विचार पूस केली पण काही मिळाली नाही साय.ऑटो चालक पप्पू भोला निषाद ऑटो क्र.MH34-D-4034 यांनी पोलीस ठाण्यात येऊन मिळालेली छोटी पर्स पोलिसांच्या स्वाधीन केले.ऑटो चालक पप्पू चा प्रामाणिक पणा पाहून महिलेला बोलावून एक टोळ्यांची सोन्याची चैन महिलेच्या हातात दिले, पोलिसांनी आणि महिला नि मिळून ऑटो चालकाचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . Api गोंदके सुधाकर परघणे,पाटील, नायडू,कतोरे माळवे, सह पोलीस कर्मचारी उपस्तीत होऊन ऑटो चालकाचा सत्कार करण्यात आला, आजही महागाईच्या काळात इमानदारी कायम आहे असे वक्तव्य api गोंदके साहेब यांनी केले.

Post a Comment

0 Comments