सांस्कृतिक महोत्सवातून विद्याथ्र्यांच्या कलागुणांचा विकास : देवराव भोंगळे

सांस्कृतिक महोत्सवातून विद्याथ्र्यांच्या कलागुणांचा विकास : देवराव भोंगळे 
कोरपना येथील स्कॉलर्स सर्च अकॅडेमित वार्षिक महोत्सव

कोरपना : विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यातील उपजत कलागुणांना वाव दिल्यास त्याचा सर्वांगीण विकास होऊन नवप्रतिभा तयार होऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
सर्च फाउंडेशन चंद्रपूरद्वारा संचालित स्कॉलर्स सर्च अकॅडमी कोरपना येथे आयोजित वार्षिक महोत्सवप्रसंगी भोंगळे बोलत होते. याप्रसंगी सर्च फाउंडेशनचे चेअरमन इंजि. दिलीप झाडे, उत्तमराव मोहितकर, इंटर्स पॉइंटचे संचालक अनिल खुजे, दीपक मस्के, पुरुषोत्तम भोंगळे, पवन राजूरकर, रेखा बोबाटे, मंदा कावडे, प्रा. कविता हिंगाणे, कुंदा झाडे आदी उपस्थित होते.
भोंगळे पुढे म्हणाले, विद्यार्थी हा भविष्यातील देशाच्या भावी पिढीचा आधारस्तंभ आहे. त्याच्यावर चांगले संस्कार शालेय जीवनापासूनच बिंबवणे आवश्यक असते. त्यातूनच तो योग्य नागरिक म्हणून घडत असतो. दिलीप झाडे यांनी, स्पर्धेच्या युगात विद्याथ्र्यांनी सर्वच क्षेत्रातील ज्ञान अवगत केले पाहिजे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेतल्यास जीवनात हमखास यश संपादन करता येते, असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही समायोचित भाषणे झालीत.
वार्षिक महोत्सवप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात विद्याथ्र्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रास्ताविक प्राचार्य ममता ढोले यांनी केले. संचालन प्रिया उलमाले, संदीप पिंपळकर यांनी, तर आभार ज्योत्स्ना दहेगावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्याथ्र्यांनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments