'जय महाराष्ट्र', 'दिलखुलास' कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत



'जय महाराष्ट्र''दिलखुलासकार्यक्रमात  
मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत

'जय महाराष्ट्र', 'दिलखुलास' कार्यक्रमात  

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत
मुंबईदि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमात  'मराठी भाषेच्या संवर्धनासाठीया विषयावर   मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  मंगळवार दि.25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होईल. तर 'दिलखुलासकार्यक्रमात मंगळवार दि.25 आणि बुधवार दि.26 फेब्रुवारी रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे तसेच  हा कार्यक्रम प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवरही ऐकता येणार आहे. निवेदिका डॉ.मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
                 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मराठी भाषा विभागशासनाकडून सुरू असलेले प्रयत्नमराठी भाषेच्या संवर्धनासाठी नवे उपक्रम व योजनाकेंद्र शासनाच्या ‍त्रिभाषा सुत्राची  प्रभावी अंमलबजावणीवाचन संस्कृती वाढावी यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रममहाराष्ट्रात अनेक बोली भाषा आहेत त्यांचे जतन व संवर्धन होण्याकरिता मराठी भाषा विभागातर्फे राबविण्यात येणारे उपक्रममराठी भाषाविकासासाठी भविष्यकालीन उपक्रम आदी विषयांची माहिती श्री. देसाई यांनी 'जय महाराष्ट्रव 'दिलखुलासकार्यक्रमातून  दिली आहे.

Post a Comment

0 Comments