डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरात "मार्शल आर्ट सेमिनार" उत्साहात पार पडला
◾एप्रिल व मे महिन्यात 21 दिवसाचे मोफत शिबिर घेण्यात येईल
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरात मार्शल आर्ट अँड स्कूल गेम्स असोसिएशन तसेच तायक्वांडो स्पोर्ट्स अकॅडमी,चंद्रपूर तर्फे मार्शल आर्ट चे सेमिनार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय अशोकजी घोटेकर ( उपाध्यक्ष,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी,चंद्रपूर ) उपस्थित होते.
त्याचबरोबर या संस्थेची विद्यार्थिनी डॉ.कल्याणी रवी नन्नावरे ही मार्शल आर्टच्या सरावाबरोबर आपली वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून ती वैद्यकीय सेवा देत आहे. त्याबद्दल तिचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच तिच्या अनुभवातून मुलींना आत्मरक्षा करणे का गरजेचे आहे तसेच त्याचे फायदे? याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या सेमिनारमध्ये चित्त थरारक प्रात्यक्षिकी करण्यात आले तसेच येत्या एप्रिल व मे महिन्यात 21 दिवसाचे मोफत शिबिर घेण्यात येईल याबद्दल माहिती देण्यात आली. या सेमिनार यशस्वीतेकरिता करिता मास्टर सुनील चवरे,मास्टर निर्धार आसुटकर,मास्टर लोकेश बनसोड,मास्टर जितेंद्र डोनेवार,मास्टर शीतल तेलंग,मास्टर लता बारापात्रे,मास्टर रमेश बर्लावार,मास्टर स्नेहल खरतड,मास्टर संतोष यनगंधलवार,मास्टर नवनीत मुन,मास्टर श्वेतम बुगावर,मास्टर रितेश पथाडे त्याचबरोबर विद्यार्थी तसेच त्यांचे आई-वडील यांची मोलाचे सहकार्य लाभले.







0 Comments