राजुरा नगर परिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्सव साजरी करण्यात आली
राजुरा,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राजूरा नगर परिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.
यावेळी माननीय नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले नगराध्यक्षांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांनी घडवलेले छत्रपती शिवरायांचे संस्कार तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्यात आले या कार्यक्रमातून महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संधी देण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षअरुणभाऊ धोटे, उपाध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी वर्ग सर्व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






0 Comments