मा.जैनुद्दीन जव्हेरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम साजरा
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे शाळेचे संस्थाध्यक्ष माननीय जैनुद्दीन जव्हेरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट वितरण कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपसचिव मा.इब्राहिम जव्हेरी सर, संस्थेचे सभासद सादिक जव्हेरी सर, मा. तसनीम जव्हेरि मॅडम, मा.ढगे मॅडम (विशेष शिक्षक पंचायत समिती बल्लारपूर)तसेच पत्रकार ज्ञानेन्द्र आर्या उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वितरित करण्यात आले. त्याचबरोबर शाळेतील बसेस चे ड्रायव्हर व कंडक्टर आणि शालेय पोषण आहार कर्मचारी व सफाई कामगार कर्मचारी यांना सुद्धा ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.असे एकूण 75 ब्लॅंकेट्स चे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाकरिता सर्व विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन वनिता गुंफेवार मॅडम तसेच आभार प्रदर्शन ज्योती खोके मॅडम यांनी केले.











0 Comments