काँग्रेस पक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
◾बल्लारपूर नगरपरिषद सदस्यपदासाठी इच्छुक काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : आगामी नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात,बल्लारपूर नगरपरिषद सदस्यपदासाठी इच्छुक काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती रविवार दि.०९/११/२०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड येथील एकदंत लॉन येथे पार पडली.
मुलाखत कार्यक्रमात बल्लारपूर विधानसभा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री आणि प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत,जैनुद्दीन जव्हेरी,घनश्याम मूलचंदानी,डॉ. रजनीताई हजारे, शहराध्यक्ष देवेंद्र आर्य प्रामुख्याने उपस्थित होते.
मुलाखतीच्या बैठकीत बल्लारपूर शहराच्या एकूण १७ प्रभागाच्या ३४ जागांसाठी ६७ इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली. इच्छुक उमेदवारांसोबत त्यांचे समर्थक पण शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
मुलाखत बैठक यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष अब्दुल करीम ,भास्कर माकोडे,प्राणेश अमराज , महमूद पठाण , अस्लम शेख ,कैलाश धानोरकर, शुभम दिवसे, गौरव परसूटकर ,फारुख शेख सादिक शेख आणि सुरेश बोप्पनवार यांनी अथक परिश्रम घेतला.










0 Comments