आजपासून दोन दिवस अंधांचे बौध्द धम्म संमेलन

 



आजपासून दोन दिवस अंधांचे बौध्द धम्म संमेलन

◾चंद्रपूरात पहिल्यांदाच होणार आयोजन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :  दि. बुध्दिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाईड नाशिक या संस्थेच्या वतीने चंद्रपूर च्या पवित्र दिक्षाभुमिवर शनिवार १ व २ नोव्हेंबर रोजी अंध व्यक्तींचे दोन दिवसीय बौध्द धम्म संम्मेलन पार पडणार आहे. 

सकाळी ९ वाजता या संमेलनाला सुरवात होणार असून या संम्मेलनाला संपुर्ण राज्यातुन १०० ते १५० अंध व्यक्ती उपस्थित राहणार आहे. चंद्रपूरात पहिल्यांंदाच बौध्द संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून चंद्रपूरकरांसाठी ती पर्वणीच ठरणार आहे.अशी माहिती समितीचे आयोजक सतिश शेंडे यांनी आज श्रमिक पत्रकारसंघात झालेल्या पत्रपरिषदेत दिली.

आठ संत्रामध्ये हे धम्म संम्मेलन होणार असुन भारतीय बौध्द महासभेच्या केंद्रीय शिक्षक व शिक्षिका तसेच समाजातिल अन्य मान्यवर व्यक्ती अंध व्यक्तींना मार्गदर्शन करणार आहे. अंध व्यक्तीला धम्मा बाल जास्तीत जास्त माहीती व त्यांचे ज्ञान वृध्दींगत व्हावे यासाठी या संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संम्मेलनाचे उद्घाटन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर  यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मं. फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष चेतन उंदिरवाडे, संघर्ष बहू. संस्थेचे अध्यद्वा किशोर सवाणे, राजेश गायकवाड तर विशेष अतिथी म्हणून बौध्द महासभेचे सचिव संदिप सोनवणे व कोषाध्यक्ष गुरु मेश्राम राहणार आहे. 

यावेळी पहिल्या सत्रामध्ये १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत बौध्द धम्मातील पुजा व साहित्याचे महत्व याबाबात कृष्णाक पेरकवार आपले विचार व्यक्त करणार आहे. दुसर्‍या सत्रात दुपारी १२ ते १ या वेळेत बौध्दाचे सण व मंगलदिन हा विषय संगिता अलोणे मांडणार आहे. तिसरे सत्रात दुपारी ३ ते ४ या वेळात होणार असून यामध्ये बुध्दाचा धम्मच हा विज्ञानवादी धम्म हा विषय डॉ. राजेश आसुधानी मांडणार असून चौथे सत्र ४ ते ५ या वेळात होणार आहे. 

राष्ट्रनिर्माण भान आणि भुमिका हा विषय धनराज लोखंडे सादर करणार आहे. पाचव्या सत्रात सायंकाळी ५ ते ६ या वेळेत बौध्द धम्माची खास वैशिष्ट्ये हा विषय सपना कुंभारे मांडणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ ते ९ या वेळात भिम बौध्द गितांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आह २ नोव्हेंबर रोजी पहिले सत्र सकाळी ९.३० ते १०.३० पर्यंत राहणार असून यामध्ये भैय्यासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य हा विषय किशोर तेलतुंबडे मांडणार असून दुसर्‍या सत्रात बुध्दाचा धम्म हाच कल्याणकारी धम्म आहे हा विषय मोहन देठे ठेवणार आहे. 

तिसर्‍या सत्रात १०.३० ते ११.३० या वेळेत स्त्रियांचे उध्दारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा विषय मंदाकिनी दुधे मांडणार आहे. समारोपिय कार्यक्रमात किशोर तेलतुंबडे, संगिता घोडेस्वार, डॉ. इसादास भडके, डॉ. रवि मुरमाडे, राजेश मडावी, निवृत्त पोलिस अधिकारी पठाण यांची उपस्थिती राहणार आहे. या दोन दिवस चालणार्‍या धम्म संम्मेलानाला जिल्हातील जास्तीत जास्त अंध व्यक्तीनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष   सतिश निकम,   राजाराम गायकवाड, स्थानिक आयोजक  सतिश शेडे,   किशोर तेलतुंबडे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा चंद्रपूर पश्चिम विभाग,दिलीप गेडाम, भारत पचारे, अशोक घोडेस्वार, विकास शेजवड, शेषराव सहारे  यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments