मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात भव्य पक्षप्रवेश
◾जिल्ह्याच्या कामगार क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यानी हातात घेतला मनसेचा झेंडा
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : औद्योगिक क्षेत्र असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश असतांना काल दिनांक 10 नोव्हेंबर ला जिल्ह्यातील अनेक राजकीय सामाजिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धमाकेदार प्रवेश करून एकच जल्लोष केला, चंद्रपूर शहरातील अनेक भागाचे तथा बल्लारपूर पडोली दुर्गापूर तथा ऊर्जानगर येथील कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश करून आपण मराठी माणसाचा हक्काचा लढा आणखी मजबूत करण्याची व मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या मनसेची ताकत वाढविण्याची घोषणा केली.
जिल्ह्यात एकीकडे संपूर्ण उद्योगात मराठी माणसाला डावलून परप्रांतीय लोकांना रोजगार मिळतं आहे, महाराष्ट्र शासनाचा उद्योगात स्थानिक मराठी बेरोजगार युवकांमा 80 टक्के रोजगार देण्याचा कायदा असतांना लोकप्रतिनिधी स्थानिक भूमिपुत्रासाठी कधीही त्यांच्या हक्कासाठी लढत नाही आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष मराठी भूमिपुत्रासाठी लढत असल्याने मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक मनसे मध्ये पक्ष प्रवेश करत असल्याचे राजकीय चित्र दिसतं आहे. काल झालेल्या या पक्ष प्रवेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकत वाढली आहे.










0 Comments