जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई, 10 जनावरांची सुटका
◾एकुण कि.अं. 8,64,000/- रू चा मुद्दा माल जप्त; चार आरोपींना अटक
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : पोलिस स्टेशन गोंडपिपरी येथे दिनांक 2/11/2025 रोजी सकाळी 9:00 वाजता मौजा विठ्ठलवाडा ते भंगाराम तळोथी रोडवरील मौजा चेकविठ्ठलवाडा बसस्टॉप जवळ मेनेरोडवर आरोपी नामे पिकअप क्रमांक MH 34 BZ 2383 चा चालक सुधाकर पांडुरंग निकोडे वय 50 वर्ष रा. भंगाराम तळोधी 2) सुधाकर वारलु झाडे वय 52 वर्ष रा. चेकविठ्ठलवाडा ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपुर 3) अशोक लेल्यॉड छोटा पिकअप क्रमांक MH 34 AB 8938 चा चालक अमर सुदर्शन मडावी वय 30 वर्ष रा. वेळगाव, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपुर 4) प्रभाकर हनुमंतु कन्नाके वय 60 वर्ष रा. बामनपेठ ता. चार्मोर्शि, जि. गडचिरोली यांनी पिकअप क्रमांक MH 34 BZ 2383 व अशोक लेल्यॉड छोटा पिकअप क्रमांक MH 34 AB 8938 मध्ये एकुण 10 नग एकुण कि.अं. 8,64,000/- रू चा माल अवैध्यरित्या गोवंशीय जनावरे क्रूरतेने व निदर्यतेने दाटीवाटीने, दोराने बांधून वाहनात कोंबून चारा पाण्याची सोय न करता कत्तलीकरिता तेलगांना राज्यात घेवून जात असताना मिळून आले. पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही चालु आहे.
सदरची कार्यवाही मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक, ईश्र्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक, सत्यजित आमले उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल याचे मार्गदर्शनात सपोनि रमेश हत्तीगोटे सा. सफौ माणिक वाग्दरकर पोहवा विलास कोवे ब.न. 2419 पो. अं. सचिन गायकवाड ब.न. 1174 चालक मपोशि. मनिषा ठाकरे ब.न. 6027 पोस्टे गोंडपिपरी यानी केले.







0 Comments