१ नोव्हेंबर रोजी इंडियन आयडल फेम यशश्री भावे यांच्या संगीत मैफलीचे आयोजन
◾इंडियन आयडल फेम यशश्री भावे उपस्थित राहणार
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : उत्तम ब्रिक्स आणि हॉस्पिटल इंडस्ट्री असोसिएशन तर्फे शनिवार १ नोव्हेंबर रोजी इंडियन आयडल फेम यशश्री भावे यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित या रंगारंग कार्यक्रमात सतीश इजमुलवार, जाफर हुसेन, डॉ. विजय गेडाम, आरिफ हुसेन, अतुल मेश्राम आणि इतर गायक सहभागी होतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गांधी करतील.
या कार्यक्रमाला सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग आंबटकर, न्यूरोसिस मल्टीस्पेशालिटी सेंटरचे संचालक डॉ. रितेश नवखरे, उडान हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक मोहनदास गडबैल आणि गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सागर वाझे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या निःशुल्क कार्यक्रमाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा अशे आवाहन आयोजकांनी केले आहे.








0 Comments