बल्लारपुर तालुक्यातील विसापूर गावात मर्डर केस मधून निर्दोष सुटका
◾आरोपीविरुद्ध कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही
◾22 जानेवारी 2024 रोजी विसापूर गावात मृतक सचिन वंगले याचा त्याच्या राहत्या घरी खून झाला होता.
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर दिनांक 11 सप्टेंबर 2025 मर्डर केस मधून निर्दोष सुटका – आरोपी विठ्ठल डबरे मुक्त जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी आज (11 सप्टेंबर 2025) एक महत्त्वाचा निर्णय देत सेशन केस क्र. 38/2024 अंतर्गत भा.द.वि. कलम 302 व 450 मधील आरोपी विठ्ठल गोसाईराव डबरे (रा. वॉर्ड नं. 1, विसापूर, ता. बल्लारपुर, जि. चंद्रपुर ) याची निर्दोष सुटका केली. Ballarpur murder Case
22 जानेवारी 2024 रोजी विसापूर गावात मृतक सचिन वंगले याचा त्याच्या राहत्या घरी खून झाला होता. अज्ञात व्यक्तीने त्याला चाकूने पाच घाव घालून खोलीत बंद केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी विठ्ठल डबरे याला दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या संशयावरून अटक केली होती.
मात्र न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपीचे अधिवक्ता अॅड. संजय प्र. बाजपेयी बल्लारपूर यांनी स्पष्ट, ठोस व पुराव्यावर आधारित युक्तिवाद सादर केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्ध कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही असे नमूद करून त्याला निर्दोष घोषित केले.
गेल्या 20 महिन्यांपासून कारागृहात असलेल्या आरोपीची सुटका दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली.





0 Comments