पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
◾पालकमंत्री यांच्या हस्ते होणार रक्तदान शिबिराचे उद्घाटन
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज (बुधवार) भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने विविध सामाजिक व लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून सकाळी ११ वाजता आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती राहणार आहे. सोबतच शहरातील विविध धार्मिक स्थळी स्वच्छता मोहिम राबवून स्वच्छ भारत अभियानाला बळ दिले जाणार आहे. सामाजिक कार्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महानगरच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, घुग्घुस येथेही राजीव रतन रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतून सामान्य जनतेला थेट लाभ मिळणार असून, पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेत समाजाभिमुख उपक्रम राबवले जात असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.






0 Comments