शांताराम पोटदुखे विधी महाविद्यलयय येथे 'शिक्षक दिवस' साजरा
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : शांताराम पोटदुखे विधी महाविद्यलयात दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिवस म्हणून दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येते. ह्या कार्यक्रमात विधी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.एजाज शेख यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शन पर भाषणात असे म्हणाले डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे उत्कृष्ट तत्वज्ञानी, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते आणि आजच्या आधुनिक जीवनात उत्कृष्ट विद्यार्थी बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:मधे काय कमी आहे, ते दुर करुन वेळेचा सदुपयोग करून समाजात योग्य योगदान दिले पाहिजे,जेणेकरून समाजसुद्धा विकसीत होणार आणि शिक्षकांच्या कार्याला हातभार लागणार.
या दिवसावसान औचित्य साधुन विधी महाविद्यलयातील विद्यार्थांनी शिक्षकांची भुमिका निभावली. साहिल बेले आणि बशरत अली यांनी प्राचार्य आणि उपप्राचार्य म्हणून स्वयंसेवक राबविले. या प्रसंगी विद्यार्थी शिक्षक म्हणून उत्कृष्ट शिक्षक म्हणून ईमास शेख आणि प्रशांत भटवलकर ह्यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केले, प्राचार्य ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. कार्यक्रम आयोजित करण्यात माजी रा.से.यो. प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला महाविद्यलयातील पदवीत्तर विभाग प्रमुख डॉ. पंकज काकडे, एल.एल.बी. विभाग प्रमुख डॉ. मनीषा आवळे, नॅक कोआर्डिनेटर डॉ. पुर्नेंदुकुमार कार, माजी रा.से.यो. प्रमुख डॉक्टर सरोजुमार दत्ता,यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमात उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. लिना लंगडे आणि विद्यार्थांनी केले, व उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद व प्राचार्य यांना सन्मान चिन्ह प्रदान करुन विद्यार्थांनी कृतज्ञता व्यक्त केली., स्वागत गीत कु. श्रेया गोरंटिवार ह्यांनी केले. आभार प्रदर्शन रा.से.यो.प्रमुख नंदकिशोर भंडारी ह्यांनी केले.







0 Comments