चार वर्षाचे प्रतिक्षेनंतर चेन्नई - बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस मूल मारोडा थांबली

 






चार वर्षाचे प्रतिक्षेनंतर चेन्नई - बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस मूल मारोडा रेल्वे स्टेशन येथे थांबली

◾आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न यामुळे अखेर मूल मारोडा  स्थानकावर थांबा मिळाल्याने ते अभिनंदनास पात्र ठरले

◾थांबा मिळाला,जंगी स्वागत मुल शहरात आनंदाचे वातावरण पसरले 



 मुल, ( राज्य रिपोर्टर न्युज )  : तब्बल 4 वषाॅचे प़तिक्षेनंतर अखेर  चेन्नई - बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसला मूल मारोडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला. जंगी स्वागत करण्यात आले, बरेच वर्षांपासून चेन्नई बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ला मुल - मारोडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. 

अखेर तो निर्णय घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाने मुल मारोडा येथे चेन्नई बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस थांबा दिला. मुल तालुका केंद्र  असलेल्या,गडचिरोली,चामोशीं,पोभुंर्णा तालुकयातील व्यावसायिक व नागरिकांना  प्रवासासाठी  सोय झाली आहे. 

चेन्नई बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे थांबा मिळावा यासाठी तीन चार वर्षा पासून कुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोती टहलीयांनी यांनी रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करुन व माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे सतत पाठपुरावा  केला. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे विभागीय मंडळाकडे तगादा लावला व सदर मागणीला यश मिळाले हे  सर्वश्रूत आहे. थांबा मिळल्याने मुल शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शासन दरबारी लोकोपयोगी विषय लावून धरावा लागतो, मागणीचे महत्व पटवून द्यावे लागते व मोठी प़तिक्षा सुद्धा करावी लागते. 

टहलियानी यांनी गत 4 वषांपासून सतत पाठपुरावा सुरूच ठेवला हे विशेष. टहलियानी यांचा सततचा पाठपुरावा व आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न यामुळे अखेर मूल मारोडा  स्थानकावर थांबा मिळाल्याने ते अभिनंदनास पात्र ठरले. 

मुल मारोडा रेल्वे स्थानकावर चेन्नई बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस थांबली,  जंगी स्वागत करण्यात आले, ह्या स्वागतासाठी कुषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती मोती टहलीयांनी, मुल भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण मोहुले, नगर परिषद माजी अध्यक्ष रत्नमाला भोयर, प्रभाकर भोयर सामाजिक कार्यकर्ता, माजी नगरसेविका गांडलेवार, पंकज लाडवे सामाजिक कार्यकर्ता, राजेंद्र चिंतावार,संजय चिंतावार, मुल शहरातील व्यापारी व नागरीक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments