मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अमन अंधेवार यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन.
◾आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आणि चुंबकीय किट वाटपासह अन्नदान, रुग्णांना फळं वाटप
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रात नवी कामगार क्रांती निर्माण झाली असून कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन शेकडो कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या नेतृत्वात हजारो कामगार जुळले आहे त्यामुळे त्त्यांच्या वाढदिवशी अनेक ठिकाणी त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून पाळ पाळला आणि आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, चुंबकीय किट वाटपासह अन्नदान, रुग्णांना फळं वाटप आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात वेग वेगळ्या तालुक्यात लोकानी शाळेत पुस्तक वाटप आणि अण्ण दान इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
स्थानिक चंद्रपूर तुकूम परिसरातील खेडुले समाज सभागृहात भव्य रक्तदान शिबीर आणि आरोग्य रोग निदान आणि हात पाय अंग दुःखी संदर्भात चुंबकीय किट वाटप करण्यात आली. जवळपास 150 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान केले तर जवळपास 360 रुग्णांना रोग निदान सह चुंबकीय किट वाटप करण्यात आले. चंद्रपूर बल्लारापूर, जुनोना यासंह विविध ठिकाणी मनसे कामगार नेते तथा जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, विधी विभाग जिल्हाध्यक्ष अजित पांडे, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळाबाँधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, पियुष धुपे, विजय तूरक्याल,वर्षा भोंबले यांचेसह महाराष्ट्र सैनिक व विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments