बल्लारपुर शहरांतील विविध प्रकारच्या समस्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश - आ.डॉ. सुधीर मुनगंटीवार
◾कन्नमवार वार्ड व डॉ. राजेंद्र प्रसाद वार्डातील नागरिकांच्या समस्यांवर अनेक दिवसांपासून प्रलंबित
◾आ. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांचे तात्काळ कार्यवाहीचे न.प.मुख्याधिकारीला आदेश
बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : शहरातील कन्नमवार वार्ड व डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड येथील नागरिकांनी गट्टू सौंदर्यीकरण व नाल्यांच्या कामासंदर्भात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामांकडे लक्ष वेधण्यासाठी शहराचे मुख्याधिकारी व क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. डॉ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली मागणी मांडली.
शहीद अब्दुल हमीद चौक ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक या मार्गालगत गट्टू सहित कलाम चौकाचे सौंदर्यीकरण, हाईमास्ट लाइटची व्यवस्था, खुल्या नाल्यांचे भूमिगत रूपांतर तसेच कलाम चौक येथे ब्रेकर बसविण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन भाजपा जिलाध्यक्ष (ग्रामीण) श्री. हरीश शर्मा यांच्या सहकार्याने देण्यात आले.
यावेळी आ.डॉ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्याधिकारी बल्लारपूर यांना तात्काळ निर्देश देत संबंधित कामे त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना शंकर कामपेल्ली, प्रकाश दोतपेल्ली, आसीफ हुसेन शेख, कृष्णा रापेलीवार, सनी गाजरलावार, नितेश रंगारी, रवि दासरवार, अशोक इलवाका, नारायण कामपेल्ली, उज्वल पवार, कृपावरम अलूरी, शुभम कन्नौजवार, विक्की माणुस मारे, प्रशांत काकडे, रमेश अकापाका, साजिद शेख, शशिकांत खोबरागडे आदी उपस्थित होते.
0 Comments