मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक
बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे या उद्देशाने वर्ग पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची निवडणूक घेण्यात आली यामध्ये वर्ग सातवी ते बारावी पर्यंत चे 27 विद्यार्थिनी उमेदवार म्हणून शालेय निवडणुकीत सहभागी झाले होते. तसेच पाचवी ते बारावी पर्यंतच्या 417 विद्यार्थ्यांनी 27 उमेदवार व एक Nota यांना मतदान केले.
शालेय निवडणूक ही ईव्हीएम पॅटर्ननुसार घेण्यात आलेली होती यामध्ये विद्यार्थ्यांना ईव्हीएम द्वारे कसे मतदान केले जाते याची प्रात्यक्षिक सुद्धा अनुभवायला मिळाले आहे यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, त्यांचे निवडणूक चिन्ह व उमेदवाराचे फोटो सहित दर्शविण्यात आलेले होते. त्याचबरोबर निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने व्हावी याकरिता निवडणूक केंद्राध्यक्ष,निवडणूक अधिकारी म्हणून मीना शेंडे, सरिता उमरे, सीमा धाडवे , वनिता गुंफेवार, तुषार चौधरी , संजय ठोंबरे हे सर्व शिक्षक कार्यरत होते. सर्वप्रथम आमच्या शाळेच्या प्राचार्या असमा खान मॅडम यांनी लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मध्ये स्वतः मतदान करून मतदानाची सुरुवात केली व यानंतर वर्ग पाचवीपासून तर बारावी पर्यंतच्या 417 विद्यार्थिनींनी 27 उमेदवारांना मतदान केले. विद्यार्थ्यांना आपले अमूल्य मत दिल्याचा आनंद द्विगुणित करता यावा यासाठी सेल्फी पॉईंट सुद्धा ठेवण्यात आला होता. अशाप्रकारे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक -2025 पार पाडण्यात आली. याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.










0 Comments