महसूल सप्ताहाचे औचित्य साधून तालुका प्रशासनाने दिली बल्लारपूर येथील पेपर मिलला भेट.

 








महसूल सप्ताहाचे औचित्य साधून तालुका प्रशासनाने दिली बल्लारपूर येथील पेपर मिलला भेट.


बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महसूल सप्ताहाचे औचित्य साधून 2 ऑगस्ट,2025 रोजी महसूल प्रशासनाने बल्लारपूर येथील पेपर मिलला भेट देऊन कंपनीचे कार्य व्यवस्थापण व सुरक्षा समबंधाने माहिती जाणून घेतली. 

बल्लारपुर पेपर मिल बिल्ट कम्पनी व्यवस्थापनाचे वतीने सर्व प्रथम तहसीलदार बल्लारपूर श्रीमती.रेणुका कोकाटे, नायब तहसिलदार सर्व श्री.महेंद्र फुलझेले, अजय मलेलवर, सतीश साळवे व इतर महसूल कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. बिल्ट पेपर मिल कम्पनी सन 1952 साली बल्लारपूर येथे स्थापित झाल्यापासून आजपर्यंत केलेल्या कार्य प्रगती समबंधाने माहिती दिली. 

कम्पनी व्यवस्थापनाने सीएसआर फंड अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील महिलांना रोजगार निर्मिती करिता सामाजिक दायित्व म्हणून प्रशिक्षण आयोजित करुन  उत्पादन व विक्री समबंधाने प्रशिक्षण देत असल्याबाबत माहिती दिली. पेपरमिल मध्ये कागद निर्मिती करतांना उपयोगात आणल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रियेची व त्यासमबंधात सुरक्षा नियमांच्या सर्व बाबी पालन करणे आवश्यक असल्याबाबत कम्पणीचे तांत्रिक अधिकारी यांनी सविस्तरपणे माहिती दिली. बल्लारपूर पेपर मिल जिल्ह्याचा नव्हे तर देशाचा गौरव असून महसूल प्रशासन सदैव कम्पनी व्यवस्थानास सहकार्य करण्यास तत्पर असेल अशी ग्वाही देऊन निरोप घेण्यात आला.




Post a Comment

0 Comments