बल्लारपुर शहर/तालुका काँग्रेस कमेटीने दिवंगत कमलाबाई वडेट्टीवार यांना श्रद्धांजली वाहिली
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या आई दिवंगत श्रीमती कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे सोमवार, १८ ऑगस्ट रोजी निधन झाले.
बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटी आणि तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने दि.२०/०८/२०२५ रोजी दिवंगत श्रीमती कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि दोन मिनिटे मौन पाळले.
यावेळी काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवा दल आणि इंटकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






0 Comments