चंद्रपूरमध्ये १८ हजार नागरिकांना घरपट्टे वाटप लवकरच;महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

 





चंद्रपूरमध्ये १८ हजार नागरिकांना घरपट्टे वाटप लवकरच;महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

◾घुग्घुस येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करणार 

◾सहा नवीन तहसीलदार कार्यालयांमध्ये पदभरती

◾शहरात तीन नवीन तलाठी सजे, एक अतिरिक्त तलाठी पद

◾बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा आणि चंद्रपूरचे काही नागरिक व महसूलचे अधिकारी उपस्थित

मुंबई,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर शहरातील महसूल विषयक बाबी वेगवान पद्धतीने निकाल निघाव्या आणि लोकांना तातडीने न्याय मिळावा यासाठी शहरासह जिल्ह्यात पदभरती करण्यासोबतच, चंद्रपूर शहरातील १८ हजार नागरिकांना नझूल आणि इतर विभागांच्या जागेवरील घरांचे पट्टे वाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. 

स्थानिक आमदारांनी कामाची गती कमी असल्याबद्दल व्यक्त केलेल्या नाराजीनंतर, महसूलमंत्र्यांनी या कामासाठी बाह्य एजन्सी नेमून तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी हे निर्देश देण्यात आले. बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा आणि चंद्रपूरचे काही नागरिक व महसूलचे अधिकारी उपस्थित होते. 

नवीन कार्यालये आणि पदभरती

​महसूल विभागातील रिक्त जागांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संजय गांधी योजना शाखेतील तहसीलदार (मनपा क्षेत्र) ही पदे पुनरुनिज्जीवित करण्याचे आदेश देण्यात आले. यासोबतच, घुग्घुस (चंद्रपूर) येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यासोबतच ६ नवीन तहसीलदार कार्यालयांमध्ये पदे भरण्यात येणार आहेत. चंद्रपूर शहर महापालिका नझूल क्षेत्रासाठी ३ नवीन तलाठी सजे आणि एक अतिरिक्त तलाठी पद जागा आणि क्रीडा संकुलाचा मुद्दा मार्गी लागला आहे.




Post a Comment

0 Comments