अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची जिल्हा कार्यकारिणी गठीत

 








अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची जिल्हा कार्यकारिणी गठीत

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची जिल्हा कार्यकारीणी २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी सोमवारी (दि.४) गठीत करण्यात आली. यात मार्गदर्शक म्हणून पुरुषोत्तम मते, अध्यक्ष म्हणून नंदिनी  चुनारकर, उपाध्यक्ष पदी वामन नामपल्लीवार, शंकर पाल, सचिवपदी प्रभातकुमार तन्नीरवार, सहसचिवपदी सुरेश तुम्मे, राम चिचपाले, कोषाध्यक्षपदी अण्याजी ढवस, विधी  आयाम प्रमुख म्हणून ॲड कल्पना जांगडे, महिला आयाम  प्रमुखपदी संगीता लोखंडे, पर्यावरण प्रमुखपदी सुषमा  साधनकर, प्रसिद्धी प्रमुखपदी प्रशांत विघ्नेश्वर, रोजगार सृजन प्रमुख तुळशीदास,     मारशेट्टीवार, ग्राहक मार्गदर्शन केंद्र प्रमुख महेश कानपिल्लेवार, आय. टी.सेल प्रमुख          प्रकाश काळे, कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रकाश चुनारकर, विजय लोखंडे, बबिता बोकडे, दिलीप सातपुते, प्रशांत कावळे, अनिल कुंटेवार, यांची निवड करण्यात आलेली आहे. 

तर ग्राहक पंचायतीच्या महानगर कार्यकारणीत मार्गदर्शकपदी हेमराज नंदेश्वर, अध्यक्षपदी शंकर उपरे, उपाध्यक्षपदी गोकुळदास पिंपळकर, सचिवपदी श्रीराम यंगलवार, सहसचिवपदी अशोक मुडेवार, कोषाध्यक्षपदी कमल सदाफळे, महिला आयाम प्रमुखपदी वनिता नंदेश्वर, विधी प्रमुखपदी अंकिता रोहनकर, पर्यावरण प्रमुखपदी अंजली धाबेकर, ग्राहक मार्गदर्शन केंद्र प्रमुखपदी कैलास गर्गेलवार यांची निवड करण्यात आलेली आहे.




Post a Comment

0 Comments