बल्लारपूर शहरात स्वातंत्र्यांचा 79 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

 




बल्लारपूर शहरात स्वातंत्र्यांचा 79 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा


बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर शहरात स्वातंत्र्यांचा 79 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय परिसरात पार पडला. सकाळी 9:15 वाजता मा. रेणुका कोकाटे, तहसीलदार बल्लारपूर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी पोलीस, होमगार्ड व सैनिक शाळेच्या पथकाने सलामी दिली.  

 या वेळी शहरातील गणमान्य व्यक्ती, माजी सैनिक सह राजकीय  पक्ष भाजप,काँग्रेस,शिवसेना विविध राजकीय पक्षाचे नेते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिक, पत्रकार बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमास नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, अजय मलेलवर, निरीक्षण अधिकारी कु. प्राजक्ता सोमलकर, मंडळ अधिकारी किशोर नवले, सुजित चौधरी, तसेच ग्राम महसूल अधिकारी राजेश अकोजवार, प्रकाश कंबलवार, अक्षय झाडे, विशाल चांदेकर, अजय नौकरकर, दीपक निंबाळकर, कु. रजनी मडावी, कु. आरती दुलत, सहायक महसूल अधिकारी दीपक वडूळे, सुनिल तुंगीडवार, अजय देवतळे, कु. सोनू गावंडे, कु. निलम नगराळे यांसह महसूल कर्मचारी पुंजाराम राऊत, अमोल डोंगरे, संदीप वेटे, सुमित वाटगुळे, कचरु गेडाम, प्राची गुजनवार उपस्थित होते.

        दरम्यान, पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास रवींद्र लहामगे, गटशिक्षणाधिकारी आनंद सातपुते, सहाय्यक प्रशासन अधिकारी सरिता उरकुडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मेगा बल्की सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विविध राजकीय पक्षाचे नेते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिक, पत्रकार बांधव उपस्थित होते.



 नगर परिषद बल्लारपुर - 

बल्लारपुर नगर परिषदेच्या कार्यालयात तसेच ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रांगण येथे स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा साजरा करण्यात आला. नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण होताच उपस्थितांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. 

या सोहळ्यास शहरातील मान्यवर नेते, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, पत्रकार, शिक्षक तसेच गांधी विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संगीता उमरे, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर सातपुते, साठा विभाग अधिकारी उपेंद्र धामणगे,लेखापाल बांगर, कर निरीक्षक गजानन आत्राम, नगर अभियंता डॉली मदन, बांधकाम अभियंता मयूर दहीकर, कृष्णा गुल्हाने,पाणी पुरवठा उप अभियंता प्रशांत गणवीर, शाम बाबु परसोटकर, राजू बाराहाते, आरोग्य निरीक्षक भूषण साळवटकर, शहर समन्वयक मयुरी भोयर तसेच सर्व लिपिक व कर्मचारी उपस्थित होते. 

भारतीय जनता पार्टी - 

भारतीय जनता पार्टी बल्लारपूर च्या वतीने व्यकटेश अपार्टमेंट येथील भाजपा पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते चंदनसिहं चंदेल, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा,अॅड.रणांजय सिंह, निलेश खरबडे, मनिष पांडे, समीर केणे, राजू दासरवार, देवेंद्र वाटकर, श्रीनिवास कुंदकुरी यांच्या सह अन्य नेते उपस्थित होते.



 काँग्रेस पक्ष -  

 15/08/2025 रोजी सकाळी 10:15 वाजता शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी ऐतिहासिक बस्ती विभागात गांधी चौकात ध्वजारोहण केले. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव घनश्याम मूलचंदानी आणि निवृत्त अध्यक्ष अब्दुल करीम शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. माजी अध्यक्ष पनमल खटोड, एम.वेंकटेश बाल बैरैया, माजी महापौर डॉ. मधुकर बावणे, दिलीप माकोडे, सुनंदा आत्राम, छाया मडावी इत्यादी काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयू आय, सेवा दल, आयएनटीयूसीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. अनिल खरतड आणि नरेश मुंदडा यांनी याचे संचालन केल. 



आम आदमी पार्टी - 

बल्लारपूर येथे आम आदमी पक्षाकडून 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 15 ऑगस्ट 2025 ला शांतीनगर या ठिकाणी आम आदमी पक्षाने यंदाही 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

 यावेळी आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार  "AAP" नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. 



रक्ततपासणी केंद्र हेल्थ केअर गौसिया मस्जिद काॅम्प्लेक्स -

रक्ततपासणी केंद्र हेल्थ केअर क्लिनीककल लॅब डॉ.बंडावार हाॅस्पीटल चे सामोर ,गौसिया मस्जिद काॅम्प्लेक्स येथे लाहान मुलांना चाक लेट वितरण करुन स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात साजरा केले. यावेळी डॉ.मयुर बंडावार, मुमताज सिद्दीकी,छोटु साठे, मनोहर दोतपेल्ली व नागरिक उपस्थित होते.


न्यू इंडिया कॉन्वेंट स्कूल -

 न्यू इंडिया कॉन्वेंट स्कूल कन्नमवार वार्ड, बल्लारपुर येथे तेलुगू पावर सदस्य स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिठाई वितरण करण्यात आले. यावेळी तेलुगू पावर सदस्य कृष्णा रापेलिवार,राकेश अनुमाला,राकेश अम्बाला,सागर रेड्डी,प्रकाश दोतपेल्ली,एड.किशोर पूसलवार,कृष्णा बाजारी,सुरेश नामिनी,सतीश बोंकुरी,सुक्का नारी  79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.


स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात -

देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करताना सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय, बल्लारपूर येथे उपविभागीय अभियंता संजोग मेंढे यांच्या हस्ते वंदनीय तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. 

या प्रसंगी बल्लारपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे अभियंता वैभव जोशी, पवन सावरकर, अनिल आंबटकर, लीनता खोरगडे, हनीफ कुरेशी, अरविंद कुचनकर, शीतल पोडे, चित्रा, माधवी मेश्राम, राहुल कुंडोजवार, हरिदास डंबारे, प्रसाद काटपतळ, सुनील बडवैक, बावणे गिरडकर, सौदागर यांसह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे ग्रामीण रुग्णालय बल्लारपुर, पोलीस स्टेशन बल्लारपूर, भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपुर, टपाल कार्यालय, विविध बँक, अनेक शासकीय-निम शासकीय कार्यालय ठिकाणी ध्वजारोहन पार पडले तसेच बल्लारपूर शहरातील विविध शाळा महाविद्यालयात ध्वजारोहन पार पडले.




Post a Comment

0 Comments