महसूल सप्ताहाच्या 5 व्या दिवशी बल्लारपूर तहसील कार्यालयात DBT व DLC प्रणालीत दुरुस्ती करीता विशेष शिबिराचे आयोजन
बल्लारपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राज्य व केंद्र शासनाच्या धोरणानुसार आता अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांचे खात्यामध्ये जमा होत असल्याने लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे व DBT पोर्टल मध्ये नोंदणी प्रमाणित करणे आवश्यक आहे. DBT प्रणाली डिसेंबर,2024 पासून सुरु करण्यात आली असून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होत आहे.
तालुक्यातील बऱ्याच लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न केले नसल्याने अनुदान मिळण्यापासून वंचित राहू नये याकरीता महसूल सप्ताहाचे औचित्य साधून दि. 5 ऑगस्ट,2025 रोजी तालुक्यातील सर्व गावांमध्ये गृह भेटी घेऊन लाभार्थ्यांचे डीबीटी व डीएलसी पोर्टलमध्ये दुरुस्ती करण्यात आली तसेच तहसील कार्यालय बल्लारपूर येथे विशेष शिबिराचे आयोजन करुन संगायो व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे पोर्टलमध्ये दुरुस्ती करण्यात आली.
विशेष शिबिराचे सफलते करीता नायब तहसिलदार सर्वश्री. महेंद्र फुलझेले, अजय मलेलवर, सतीश साळवे, निरीक्षण अधिकारी कु.प्राजक्ता सोमलकर, मंडळ अधिकारी सर्वश्री. किशोर नवले, सुजित चौधरी, ग्राम महसूल अधिकारी सर्वश्री. अकोजवार, कंबलवार, झाडे, चांदेकर, नौकरकर, निंबाळकर कु.मडावी, आरती दुलत सहायक महसूल अधिकारी सर्वश्री. दीपक वडूळे, सुनिल तुंगीडवार, अजय देवतळे कु.सोनू गावंडे, कु.निलम नगराळे, सेतू केंद्र चालक सर्वश्री. दीपक मांढरे, रायपुरे, दुबे,नाईक, तसेच इतर महसूल कर्मचारी सर्वश्री.पुंजाराम राऊत, अमोल डोंगरे, संदीप वेटे, सुमित वाटगुळे, कचरु गेडाम, कु.प्राची गुजनवार इत्यादी कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
0 Comments