20 दिवसानंतरही आरोपी पोलिसांच्या ताब्यातून बाहेर
◾आरोपींवर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
◾पत्रपरीषदेत पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या महिला जिल्हाध्यक्षा वाघमारे चा इशारा
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : मूल तहसीलमधील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,परंतु 20 दिवसांनंतरही आरोपी पोलिसांच्या अटकेबाहेर आहे.
यामुळे पोलिस विभागाच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण होते आहे असा आरोप पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या महिला विंगच्या जिल्हाध्यक्षा नभा वाघमारे यांनी करत आरोपीला लवकर अटक न केल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पत्रकार परीषदेत दिला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते अयशस्वी ठरले आहेत, अत्याचाराच्या मुद्द्यावर पोलिस प्रशासन उदासीनता दाखवत आहे.
गावात आरोपीच्या भीतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीच्या भीतीमुळे अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यास घाबरत आहे. आरोपीचा भाऊ कांग्रेसचा कार्यकर्ता असल्याने प्रकरण दाबल्या जात आहे आणि आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नभा वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जर आरोपीला दहा दिवसांत अटक केली नाही तर ती जिल्हा पोलिस कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
0 Comments