श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त 20 ऑगस्ट रोजी विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धा कमल स्पोर्टींग क्लबचे आयोजन

 




श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त 20 ऑगस्ट रोजी विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धा कमल स्पोर्टींग क्लबचे आयोजन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती व कमल स्पोर्टींग क्लब, चंद्रपूर च्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजेपासुन विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

                स्थानिय विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर येथील टागोर शाळेच्या भव्य पटांगणात होत असलेल्या या दहीहंडी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. मनपाचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, कमल स्पोर्टीग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर व अन्य मान्यवर अतिथींची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कमल स्पोर्टीग क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments